विद्यामंदिर दुर्गेवाडी येथे शालेय बाजार उत्साहात
विद्यामंदिर दुर्गेवाडी येथे शालेय बाजार उत्साहात
हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप
धरणग्रस्त दुर्गेवाडी मधील विद्यामंदिर दुर्गेवाडी या शाळेतील कोरोनाच्या काळानंतर तहकूब असलेला तीन वर्षाच्या काळानंतर चिमुकल्यांचा शालेय बाजार उत्साहात भरला. या बाजारासाठी पालकांची अलोट गर्दी झाली होती बाजारामध्ये विशेषता मुलांना देवान- घेवान, आर्थिक व्यवहार,व्यवहार ज्ञान, कळावा या अनुषंगाने हा बाजार राबविण्यात आला तसेच मुलांना वजनमापी कळावी,बाजारातील खरेदी-विक्री कशी चालते हे समजावे या अनुषंगाने या बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.
वि.मं. दुर्गेवाडी शाळेमध्ये अनेक सहशालेय उपक्रम राबविले जातात या शाळेची गुणवत्ता दर्जा ही चांगल्या प्रकारे आहे. शाळेमध्ये उच्चशिक्षित शिक्षक असून मुलांना चांगल्या प्रकारे घडविणैचे काम करत आहेत तसेच लाईटची किंवा स्वच्छ पाण्याची सोय ,शौचालय इ.सोयी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शाळेमध्ये आहे त्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहूल घोलप,सदस्य सूरेश वकटे,सौ.सुरेखा थोरात मुख्याध्यापक बाळासो कोळी सर, अध्यापक राजेंद्र भोसले सर,सौ,शोभा कुंभार मॅडम,सौ.कवाता घोलप ,पालक वर्ग,ग्रा.पं.बाॅडी व गावकरी उपस्थित होते .