खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार संशयिताला अटक
खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार संशयिताला अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहर पोलीस ठाण्या दाखल खुनच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला गुरुवार २२ डिसेंबर रोजी स्थानिक गणेश शाखेने जळगाव तालुक्यातील आसोदा येथून अटक केली आहे. नरेंद्र उर्फ भुऱ्या उर्फ भद्रा पंडित सोनवणे, (वय-३१) रा. आसोदा जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे, याच्या २० डिसेंबर रोजी सायंकाळी खुन झाला होता. गुन्हा घडल्यापासून नरेंद्र उर्फ भुऱ्या सोनवणे हा फरार होता.
जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयित नरेंद्र उर्फ भुऱ्या हा त्याच्या गावात असल्याची गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील, यांना मिळाली.
त्यानुसार पो.हे.कॉ विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, सचिन महाजन, यांच्या पथकाने गुरुवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी संकेत नरेंद्र उर्फ भुऱ्या यास त्याच्या आसोदा गावातून अटक केली. त्याला पुढील कारवाई साठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.