मोबाईलची जबरी चोरी करणारे चोरट्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
मोबाईलची जबरी चोरी करणारे चोरट्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात एमपीएससी तयारी करण्यासाठी मुंबई येथुन जळगावात आलेल्या तरुणाची मोबाईल हिसकावून मोटरसायकल पळ काढणाऱ्या तिघांपैकी दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे अटकेतील दोघांना रामनंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशाल दिनकर सपकाळे शास्त्रीनगर जामनेर आणि आकाश कडु अल्हाट रा. शिवाजीनगर जामनेर अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्या तिसरा साथीदार योगेश सोनार रा. जामनेर हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. योगेश सोनार यांच्या मदतीने दोघांनी हा मोबाईल चोरीच्या गुन्हा केल्याची दोघांनी काबुली केली आहे. त्यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरन नं २८५/२०२२ भा.द.वी कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल आहे.
अधिक माहिती अशी की, नवी मुंबई येथील तरुणी आपल्या मैत्रिणीसह एमपीएससीच्या क्लास साठी जळगाव येथे राहत होती. ती आपल्या मैत्रिणीसह मोबाईलवर बोलत पाय चालत असताना तिला चोरट्यांनी भरधाव मोटरसायकलवर येत मोबाईल हिसकावून पलायन केले होते. त्यात तरुणी खाली पडून जखमी झाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील पो.हे.कॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, संदीप साबळे, पोना विजय पाटील, पोना अविनाश देवरे, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, पो.कॉ सचिन महाजन, पोना किरण धनगर, आदींच्या पथकाने या गुन्हाच्या तपासणीकामी सहभाग घेतले