नायब तहसीलदार सह कोतवालास लाच स्विकारतांना आटकतांना
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, 37 वर्ष.
रा. नाशिक
▶️ *आलोसे-*
१) श्रीमती कल्पना शशिकांत निकुंभ, वय-57,
व्यवसाय- निवासी नायब तहसीलदार , तहसील कार्यालय निफाड जि नाशिक,
२) अमोल राधाकृष्ण कटारे वय .३८ वर्ष. धंदा-नोकरी,(कोतवाल) तहसील कार्यालय निफाड, जिल्हा- नाशिक.
▶️ *लाचेची मागणी-*40,000/-रुपये तडजोड अंती 35000/- रु
दि.21/12/2022
▶️ *लाच स्विकारली-* 35,000/-रु. दि.21/12/2022
▶️ *हस्तगत रक्कम-* 35,000/-रू.
▶️ *लाचेचे कारण -*.
यातील तक्रारदार यांचे चुलत आजोबा व इतर यांचे मौजे पिंपळगाव नजीक मधील गट नंबर 13 /1/1 पैकी क्षेत्र 8300.00 चौ. मीटर क्षेत्र बिनशेती करणे कामी केलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रकरणातील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून सदरचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात यातील अलोसे क्र. 1 यांनी तक्रारदार यांच्याकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती 35,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले, तसेच यातील आलोसे क्र. 1, यांचे सांगणे वरून आलोसे क्र.2 यांनी प्रशासकीय इमारतीमधील पुरुष प्रसाधन गृहात सदर लाच रक्कम 35000/- पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी-*
श्री अनिल बागुल, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
▶️ *सहसापळा अधिकारी-*
श्रीमती गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक,अँन्टी करप्शन ब्युरो, नासिक.
▶️ *सापळा पथक*-
पो.ना. अजय गरुड, पो.ना.किरण अहिरराव चा.पोहवा. संतोष गांगुर्डे अँटी करप्शन ब्युरो, नाशिक
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा. अप्पर मुख्य सचिव, महसूल, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक