मोहाडी येथे तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला
मोहाडी येथे तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव: (मोहाडी) येथे घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीच्या मृतदेह गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या विहरीत आढळून आल्याची घटना जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात रविवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पूजा भीमराव पवार, (वय-१६) रा.मोहाडी. असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अक्समत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे पूजा भिमराव पवार ही तरुणी कुटुंबीयास राहायला होती. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी च्या सुमारास तरुणीच्या सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर तिच्या कुटुंबियाने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रविवारी दुपारी दीड वाजता सुमारास गावातील ग्रामपंचायत जवळील. विहरीमध्ये तरुणीच्या मृतदेह पाण्यावर तरंगताना गावरयांना दिसून आला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.