जामनेरात मतमोजणीला दोन गटातील तुफान दगडफेक; एक भाजपा कार्यकर्ताचा मृत्यू.
जामनेरात मतमोजणीला दोन गटातील तुफान दगडफेक; एक भाजपा कार्यकर्ताचा मृत्यू.
प्रतिनिधी शाहिद खान
जामनेर: तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात झालेल्या दगडफेक भाजपा कार्यकर्ताचा मृत्यू झाला आहे. धनराज माळी, असे मयत झालेले भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
जामनेर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत भाजपा विरुद्ध भाजपा अशी लढत होती. निवडनुकीचा निकाल नंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात एक दगड हा धनराजच्या डोक्याला लागला. त्याला दवाखान्यात नेण्यात आलेला त्याच्या त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
निकालनंतर विजय झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या. त्यांच्यावर प्राबूत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी संशयितांना धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.