मुस्लिम बांधवांच्या तब्लिगी इज्तेमा विषयी थोडक्यात माहिती*.
*एकदा अवश्य वाचा* � *मुस्लिम बांधवांच्या तब्लिगी इज्तेमा विषयी थोडक्यात माहिती*.
*काय असते तब्लीगी इज्तेमा*??
🍀 *इज्तेमा म्हणजे (जाहिर अधिवेशन)*🍀
“तब्लिगी इज्तेमा” हा काय प्रकार असतो याचे कुतुहल हिंन्दु धर्मातील व इतर धर्मातील जनतेला ही माहित असणे ही या धर्म व जाती पातीत लढणाऱ्या मानव जातीला माहित असणे फार अवश्यकआहे.
म्हणून आपण तब्लिगी जमात चा आधी परिचय करून घेऊ या!
पाठीवर भलेमोठे बॅग,पिशव्यांचे गाठोडे वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा,घातलेले लांब दाढी,व टोपी वाल्यांचा जत्था रस्त्याने जात असतांना त आपण बर्याच वेळा पाहिला असेल.हे जत्थे म्हणजे काही मोजक्या यशस्वी मुस्लिम चळवळी पैकी एक ती चळवळ आहे.तबलिगी जमात.इ.सन-1927 मध्ये हरियाणा राज्याच्या मेवात शहरात *मौलाना इलियास कांधीलवी*(हजरत जी) यांनी स्थापना केली.विशेष म्हणजे ही संघटना किंवा सांप्रदाय नसून फक्त एक धार्मिक चळवळ आहे. याचे मुख्य केंद्र न्यु दिल्ली निजामुद्दीन परिसरात आहे. *(हजरत मौलाना साद सहाब*) हे सध्या याचे सुप्रीमो आहेत.भारत,पाकिस्तान,श्रीलंका , बांग्लादेश,आफ्रिका,नेपाळ व इतर आशियाई देश यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहेत.भारतीय उप महाद्विपात इतरांच्या अंधानु करणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रूढी परंपरा,चालीरितीच्या अहारी येथिल समाज गेला होता.त्यात सुधारणा करून खरा इस्लाम धर्म लोकांना समाजाऊन सांगणे, नमाज पढण्याची पद्धत शिकवणे, तसेच दारू बंदी, व्यसन मूक्ती, व्यभिचार मूक्ती व इतर वाईट चालिरिती-सवयी बदलण्यासाठी, निर्मुलना करिता यात प्रशिक्षण दिले जाते.यांचे कुठेही स्थानिक कार्यालय नसते.गावा-गावात जत्थे(जमात)बनवून मस्जिदीत काही दिवस मुक्काम करतात, तिथल्या स्थानिक लोकांचे प्रबोधन करतात आणि तिथल्या काही स्थानिक लोकांना सामील करून तो जत्था पुढे जातो.तीन दिवस,दहा दिवस,40 दिवस,4 महिने किंंवा 01वर्ष असे वेग- वेगळ्या कालावधीत प्रत्येक जण आप आपल्या सोयीनुसार या जत्थ्यात योगदान देत असतो. ज्यांचा कालावधी पूर्ण झाला तो घरी निघून जात असतो आणि नवीन व्यक्तीं (“साथी”)चा कालावधी सुरू होत असतो. अशाप्रकारे हे जत्थे एकाच वेळी जगभरात भ्रमण करत असतात. लोकं बदलत असतात पण जत्था (जमात)तीच राहते.काही जमात एकमेकांत merge केली जातात तर काही जमाती मोठ्या झाल्या की त्याचे दोन तीन गटांत विभाजन करून वेगवेगळ्या दिशेने पाठवल्या जातात.यांचे नियोजन करण्यासाठी कुठेतरी वर्षातून,महिन्यातून “जोड” हा कार्यक्रम ठेवला जातो.जत्था चा एक स्थानिक “अमीर (प्रमुख)” निवडला जातो.जागो जागी रोज मस्जिदीत दिवसातून एकदा “मशवरा(सल्ला मसलत)”होत असते.मुस्लिम वस्तीत प्रत्येक नमाज नंतर गस्त घातली जाते. घरो-घरी जाऊन प्रबोधन केले जाते,नमाज साठी आमंत्रित केलं जाते, तसेच जमात सोबत दुसर्या गावी निघण्याकरिता आग्रह केला जातो.अशा प्रकारे ही जमात म्हणजे धार्मिक शिक्षणाचे प्रौढ शिक्षणा साठी एक चालती बोलती शाळा (मदरसाच)आहे.
ह्या जमात चे लोकं दर्गा वर जाणे, तिथं नवस करणे,नवस फेडणे, वैगरे अश्या गोष्टींना मानत नाही. ही एक गैर राजकीय चळवळ आहे.इतर लौकिक बाबतीत राजकीय कोणती ही चर्चा किंवा वक्तव्य करत नाही.फक्त धार्मिक आणि त्यातल्या त्यात नमाज पढण्यावर ही जमात जास्त भर देते.
यांच्या *इज्तेमा (जाहिर अधिवेशन)* यामध्ये वक्त्याचे नाव दिलेले नसते तर फक्त “बयाण (भाषण)” आणि त्याची वेळ दिलेली असते.लग्न कार्यात उधळपट्टी नको, *आई-वडिल यांची सेवा,पती पत्नीचे हक्क व अधिकार,मुलांचे संगोपन हलाल कमाईचे महत्व, शिष्टाचार,मोहम्मद पैगंबर सं.यांचा जिवन परिचय,त्यांंचा समाजासाठी त्यांग,त्यांंची शिकवण,प्रबोधनाची गरज, त्यासाठी त्यागाचे महत्व, नमाज चे महत्व,यासारखे अनेक विषय त्यांच्या भाषणाचे असतात* माञ अमीर(मुखिया) याचा आदेश वेळेचे नियोजन
यांची शिस्त वाखाण्या जोगी आहे. इज्तेमाच्या शेवटी *स्वतःसाठी,समासाठी,देशासाठी व संपूर्ण जगातील मानव जाती साठी एक-एक,दोन-दोन तास दुआ मागितली जाते*. सर्व साधारण पणे देवबंद,नदवा, अक्कलकुवा,दिल्ली वैगरे मदरश्यातील उलेमा (विचारवंत) मौलवी हे यांचे मार्गदर्शक असतात.जमात मध्ये सोबत प्रवासात असतांना हे एकमेकांशी ज्याप्रमाणे सौजन्याने वागतात, ते कौतुकास्पद आहे.जमात मधिल बांधवांसाठी सोशल मीडियाचा वापर,व्हिडिओ,फोटोजचा वापर वगैरे आधुनिक बदल ही आता यात होत आहेत, ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे. *चितेगाव,औरंगाबाद* येथे नुकतच काल संपन्न झालेल्या इज्तेमा मध्ये उपस्थित लाखोंच्या जन समुदायाने ‘प्रतिसाद दिला दरम्यान चितेगाव मधील इज्तेमा साठी ऐतिहासिक गर्दी झाली होती.लाखोंचा जनसमुदाय एकत्र येवुनही कुठेही कोणालाही धक्का सुद्धा लागला नाही,कोणाची ही कोणा विषयी तक्रार नाही की कोणी कोणावर रागावले सुद्धा
नाही.अगदी शांत,संयमाने आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रत्येक जण एक मेकांना साथ देत पुढे सरकत होता.या माध्यमातुन प्रचंड शिस्त आणि एकीचे दर्शन घडले.अल्लाह ची रहेमत(कृपा) आणि हजारों लोकांनी केलेली खिदमत (सेवा)ह्यामुळे चितेगांंव औरंगाबाद चा इज्तेमा यशस्वी ठरला.मंडप साठी,खड्डे घेण्यां पासून, नळ फिटींग,वजु खाने,
स्वच्छता गृह,लाईट फिटींग , पाईप लाईन,शेत तळे,बिछायत, (चटई टाकणे),साफ-सफाई, निगरानी (देख-रेख),साऊंड सिस्टम,दवाखाने आणि त्या ठिकाणी कार्यरत डॉक्टर्स,
कर्मचारी,मोफत चहा-पाणी वाटप ट्रॅक्टर, टँकरने पाणी पुरवठा करणारे,शेत जमिन उपलब्ध करून देणारे,वाहने लावण्या पासुन ते सोडण्या पर्यंत च्या पार्किंग ची व्यवस्था करणारे, रस्त्या रस्त्यावर इज्तेमाची दिशा दाखवणारे,वाहनांच्या टायरचे पंम्चर मोफत काढुन देणारे,बस स्टँड सह इतर भागातुन इज्तेमा साठी जाणाऱ्यांना स्वत:च्या वाहनातून मोफत नेवुन सोडणारे, इज्तेमा च्या तयारी पासुन ते शेवट पर्यंत भोजनाची व्यवस्था करणारे ज्ञात व अज्ञात पध्दतीने इज्तेमाच्या ठिकाणी खिदमत (सेवा) करणाऱ्या हजारों लोकांना त्यांच्या कार्यकुशलतेची पावती मिळते. या इज्तेमाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची इस्लाम धर्माची सकारात्मक प्रतिमा उजळून येत आहे,जी सर्वासाठी आदर्श ठरणारी आहे.
…..,,,,संकलन…..,,
ईसाक शेख जवळकी
ता.नांदगाव जी.नाशिक