बेकायदेशीर गावठी कट्टयासह दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात
बेकायदेशीर गावठी कट्टयासह दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे गावठी कट्टा बाळगून याच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी सायंकाळी ६ वाजता अटक केली.
या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे गावठी कट्ट्यात दोन जण फिरताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळविले वरुन शोध पथकातील कर्मचारी तयार करून जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ येथे गेले कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईमध्ये अक्षय प्रकाश घारु (वय- २१) व नितीन देवीदयाल सालवे (वय-२५) दोघे रा. (फुकटपुरा ब्रहाणपूर मध्य प्रदेश) अटक करण्यात आरोपींचे नाव आहे. यांच्याविरुद्ध आर्म ऑक्ट कलम ३/२५ तसेच मा.पो अधिनियमचे कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन प्रमाणे दि. १७-१२-२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांच्या कब्जातून २०,००० रु किंमतीच्या गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, सो. व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सो, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित मा. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार आनंदसिंगसिंग पाटील, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, पोना विकास सात दिवे, किशोर पाटील, योगेश बारी, गणेश शिरसाळे, पो.कॉ किरण पाटील, आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे. कॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.