ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात थंडी परतणार, या दिवसापासून जाणवणार कडाक्याचा गारठा.!

महाराष्ट्रात थंडी परतणार, या दिवसापासून जाणवणार कडाक्याचा गारठा.!

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

▪️ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परतणार आहे. उत्तर भारतातील हिमाचल, पंजाब आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून, येत्या सोमवारपासून (ता.19) महाराष्ट्रातही पारा घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

▪️बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदौस चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. सध्या दिवसभर उकाडा व रात्री काहीशी थंडी जाणवते. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही झाला.

आता पुन्हा एकदा कडाक्याची थंडी परतणार आहे.

▪️मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीत वाढ होईल. किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपेक्षा कमी असेल. तसेच दिवसभर अंशतः ढगाळ असलेले आकाश आता पूर्णत: निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

▪️ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम झाला असून, रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषधफवारणी करावी लागत आहे. थंडी वाढल्यास पिकांना फायदा होण्याची आशा आहे.
_

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!