दारु पिण्यास पैसे न दिल्याने एकाला डोक्यात दगड मारला ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दारु पिण्यास पैसे न दिल्याने एकाला डोक्यात दगड मारला ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण करून गंभीर जख्मी दुखापात केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश चंदन मलके ( वय- २८) रा. व्यावसाय किराणा दुकान रामेश्वर जळगाव असे जख्मी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत माहिती अशी की, अंकुश चंदन मलके सायंकाळी ४ वाजेच्या खाजगी कामानिमित्त पन्नालाल वखार नर्सरी जवळून मोटरसायकल ने जात असतांना कुणाला बागळे जाखनी नगर कंजरवाडा जळगाव त्याने मला आवाज देऊन मला थांबवले मी थांबल्यानंतर त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले तेव्हा मी त्याला सांगितले आता माझ्याकडे पैसे नाही मी तुला उद्या पैसे देतो. माझ्या बोलण्याचा त्याला राग आला व त्याने त्याचे जवळ असलेला दगड उचलून माझ्या डोक्यात मारला व मला दुखापत केली. मी लागलीच सिविल हॉस्पिटल उपचारासाठी गेलो तिथून उपचारासाठी गेलो. मी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ नितीन पाटील करीत आहे.