शिरसोली नाक्या परिसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार हातात घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
शिरसोली नाक्या परिसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार हातात घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील शिरसोली नाक्या परिसरात कमरेला लोखंडी तिक्ष्ण हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ८:०० वाजता ताब्यात घेतलेले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाक्या परिसरात गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी (वय-२२) रा. सद्गुरु नगर शिरसोली नाका तांबापुरा हा तरुण १५ इंची लांबीच्या लोखंडी तिक्ष्ण हत्यार हातात घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ८:०० वाजता कारवाई करत संशयित आरोपी गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी याला ताब्यात घेतले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार आनंदसिंगसिंग पाटील, धर्मा पाटील, पो.हे.कॉ अल्ताफ पठाण, पो.ना गणेश शिरसाळे, पो.ना सचिन पाटील, पो.ना विकास सातदिवे, पो.ना सचिन पाटील, पो.कॉ छगन तायडे, पो.कॉ मुकेश पाटील, पो.का राहुल रानडे, पो.का विशाल कोळी, आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पो. हे.कॉ अल्ताफ पठाण करित आहे.