तरुणाला मारहाण, शिवीगाळ, धमकी देणाऱ्या तीघांना अटक
तरुणाला मारहाण, शिवीगाळ, धमकी देणाऱ्या तीघांना अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील नेरीनाका श्मशानभुमीजवळ जुन्या वादातून एका तरुणाच्या रस्ता अडवून शिवीगाळ करत महाराणा करण्याची धमकी देणाऱ्या करणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी १२ डिसेंबर रोजी रात्री जैनाबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्मशानभुमीजवळ आकाश सुखलाल ठाकूर ( वय-२२) रा. तुकारामवाडी हा तरुण रविवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या मित्र पवन दिलीप बाविस्कर व गजानन राजेंद्र पारे, असे उभे होते. यावेळी जुन्या भांडण्याच्या कारण वरून पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर ( वय-२०) रा. तुकारामवाडी, कुणाल उर्फ दुंड्या किरण कोळी (वय-१८) रा. कुसुंबा जि जळगाव, रोहित उर्फ भाल्या उत्तम भालेराव (वय-२३) रा. तुकारामवाडी आणि स्वप्निल उर्फ गोली धर्मराज ठाकूर रा. ज्ञानदेव नगर जळगाव या 14 मी आकाश ठाकूर याचा रस्ता अडवून त्याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली होती. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघे आरोपी हे फरार होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शन खाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ रामकृष्ण पाटील, पो.ना किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, सचिन पाटील, यांनी कारवाईत करत संशयित आरोपी पियुष ठाकूर, रोहित भालेराव, आणि कुणाल कोळी, या तीन जणांना सोमवारी १२ डिसेंबर रोजी रात्री जैनाबाद येथे अटक केली आहे.