घणसोली विभागातील नमुंमपा मैदानांची वार्षिक देखभाल दुरुस्ती कामांमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार !
घणसोली विभागातील नमुंमपा मैदानांची वार्षिक देखभाल दुरुस्ती कामांमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार !
सुबोध सावंत –नवी मुंबई प्रतिनिधि.
नवी मुंबई : सन 2019 – 2020 या वर्षातील घणसोली विभागातील नमुंमपा मैदानांची वार्षिक देखभाल दुरुस्ती कामांमध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे संशय. सदर माहिती माहिती अधिकार माध्यमातून उघड झाले आहे. घणसोली विभागात एकूण नऊ मैदाने येतात. त्या मैदानांची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यात आली. सदर मैदाने ही नमुंमपाच्या घणसोली विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत येतात आणि त्याची जबाबदारी उपअभियंता अधिकारी श्री. रमेश गुरव आणि श्री. विश्वकांत लोकरे यांच्यावर आहे व होती. सदर मैदानांना जवळपास चाळीस लाख एकवीस हजार पाचशे चौर्यांनव रुपये खर्च करण्यासाठी आदेश काढण्यातआले .सदर काम कोपरखैरणे येथील कंत्राटदार मे. मल्हार कन्स्ट्रकशन फर्म यांना देण्यात आले होते व त्याची मुदत 13/8/2019 ते 12/8/2020 पर्यन्त होती. 23 जानेवारी 2020 पासून कोविड 19 मुळे देशभरात लॉकडाउन लावण्यात आले. या काळात सर्व कामे बंद असताना या कंपनीने कामे कशी पूर्ण केली? असा प्रश्न उपस्थित होतो. कामे पूर्ण जर केली असतील तर ती दिसली का नाहीत? म्हणजे कोविड काळात कामे पूर्ण झाली नसताना ती पूर्ण करण्यात आल्याचे दाखवून त्या कामांची बिले मंजूर करून घेण्यात आली. ह्या सर्व प्रक्रियेमद्धे कंत्राटदार तसेच विभागीय वरिष्ठ अधिकारी यांच्या संगणमताने भ्रष्टाचार
झाल्याचे निष्पन्न होते आहे . आयुक्त महोदय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करताना त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 नुसार 18% व्याज दराने सदर रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी समस्त घणसोलीकरांनी केली आहे.