गोलाणी मार्केट दुचाकी लांबवणारे दोघे चोरटे एलसीबीच्या ताब्यात
गोलाणी मार्केट दुचाकी लांबवणारे दोघे चोरटे एलसीबीच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लांबविणऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पांडे चौकातून दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विजय उत्तम सुतार ( वय-३५) आणि चंचल ओमप्रकाश सालवी (वय- ३८) दोघे राहणार गोलाणी मार्केट जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथून तरुणाची दुचाकी लांबवल्याची घटना ११ डिसेंबर रोजी ४ वाजता घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी पांडे चौकात दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईची सूचना दिल्या. मंगळवारी डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पांडे चौकात सापळा रचून संशयित आरोपी विजय उत्तम सुतार आणि चंचल ओमप्रकाश सालवी असे दोघी रा. गोलाणी मार्केट जळगाव या दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयीत आरोपींना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.