ताज्या घडामोडी

समृद्धी महामार्गावर धावणार ‘लालपरी’! १५डिसेंम्बर पासुन‘या’ नागरिकांना मिळणार ५० टक्के सवलत; जाणून तिकीट दर

समृद्धी महामार्गावर धावणार ‘लालपरी’! १५डिसेंम्बर ‘या’ नागरिकांना मिळणार ५० टक्के सवलत; जाणून तिकीट दर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर आता अवघ्या 5 तासांवर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीची नागपूर- शिर्डी विनावातानुकुलित सेवा १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून सुरू होणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट वातानुकूलित बसला भीषण आग, पहा व्हिडिओ… )
१५ डिसेंबरपासून नागपूर-शिर्डी महामार्गावर लालपरी धावणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथून रात्री ९ वाजता बस शिर्डीसाठी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी शिर्डी येथून रात्री ९ वाजता बस सुटेल ही एसटी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नागपुरात दाखल होईल.

किती असेल भाडे?

नागपूर-शिर्डी या मार्गावर विनावातानुकुलित एसटी बसचे तिकीट दर १३०० रुपये एवढे असणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल.

६५ वर्षांवरील नागरिकांना तिकिटांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये

लांबी ७०१ किमी

एकूण जमीन : ८३११ हेक्टर

रुंदी : १२० मीटर

इंटरवेज : २४

अंडरपासेस : ७००

उड्डाणपूल : ६५

लहान पूल : २९४

वे साईड अमॅनेटीझ : ३२

रेल्वे ओव्हरब्रीज : ८

द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)

द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष

कृषी समृद्धी केंद्रे : १८

एकूण गावांची संख्या : ३९२

प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये

एकूण लाभार्थी : २३ हजार ५००

वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये

कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६

द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत

ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!