जळगाव शहरात दोघे अटल गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार
जळगाव शहरात दोघे अटल गुन्हेगार
एक वर्षासाठी हद्दपार
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात दोघे अटल गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील आकाश अजय सोनार ( वय- २१ रा. लक्ष्मी नगर पंचमुखी हनुमान मंदिरच्या मागे जळगाव, आणि अविनाश रामेश्वर राठोड, ( वय-२१ रा. रामेश्वर कॉलनी, रेणुका मंदिर जवळ जळगाव, असे दोघे अटल गुन्हेगार हद्दपार केलेल्या दोघांची नावे आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात हद्दीत खुनाच्या प्रयत्न करणे, मारामारी करणे, या सदराखाली दोघांविरुद्ध १० गुन्हे दाखल असून त्यांना वेळोवेळी अटक झालेली आहे. तरीदेखील त्यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांच्यावर कायद्याच्या वाचक रानासाठी दोघांना जळगाव शहरात हद्दी हद्दपार प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून दोघा आरोपीतांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे जळगाव शहरात एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शन खाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना सचिन पाटील, म.पो.ना. निलोफर सैय्यद, पो.ना. सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.