जळगाव विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या खून ; एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात
जळगाव विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या खून ; एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात मेहरुण येथील रहिवासी प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी ( वय ३३) रा. असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसापासून भूषण हा तरुण बेपत्ता होता मात्र त्याच्या अखेर त्याच्या मृतदेच हाती लागला आहे.
दिनांक 10/12/2022 रोजी सकाळी 07:00 वा. प्रमोद सुरेश शेट्टी, वय 33 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण, जळगाव हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव येथे नेहमीप्रामणे कामासाठी गेले होते. ते विद्यापीठात कॉन्टॅक्ट सिस्टीम वर काम करीत होते. त्यानंतर सायंकाळी 05:00 वा. ते घरी नव्हते. म्हणुन त्यांचे नातेवाईकांनी शोध घेतला होता. ते बेपत्ता झाल्याने दिनांक 11/12/2022 रोजी प्रमोद शेट्टी यांचे वडील सुरेश हरी शेट्टी, वय 63 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण, जळगाव यांनी एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला हरविलेबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे मिसींग दाखल करुन प्रमोद शेट्टी यांचा शोध सुरु होता..
यादरम्यान आज दिनांक 12/12/2022 रोजी सकाळी 11:00 वा. च्या सुमारास जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील कचरा फॅक्टरी च्या लगत असलेल्या महादेव मंदीराच्या मागील बाजुस एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळुन आल्याची माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी श्री. सुरेश शेट्टी यांनी जावून सदरचे प्रेत हे त्यांचा मुलगा प्रमोद उर्फ भुषण सुरेश शेट्टी, वय 33 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण, जळगाव यांचे असल्याचे ओळखले होते. सदर मिसग व्यक्तीचा खुन झाला असल्याचे परीस्थीतीजन्य पुराव्यावरुन दिसत असल्याने जळगाव तालुका पो.स्टे. गुरनं. 357/2022 भादवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा खुन हा कोणत्या कारणांनी झाला व कोणी केला याची माहीती काढणे सुरु केले होते. यादरम्यान एम.आय.डी.सी. पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाला माहीती मिळाली कि, सदरचा खुन हा ।) सत्यराज नितीन गायकवाड, वय 26 वर्ष, रा. गणेश नगर, जळगाव, 2) सुनिल नियामतखाँ तडवी, वय 26 वर्ष, रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव यांनी केला आहे. व ते उमाळा ता. जि. जळगाव शिवरात असलेल्या जंगलात लपुन बसले असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे व गुन्हे शोध पथकाचे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छंगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील असे रवाना झाले होते. उमाळा ता. जि. जळगाव शिवारातील जंगलातुन त्यांना संध्याकाळी 06:00 वा. च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असुन दोघांची विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा खुन केल्याचे कबुल केले त्यावरुन पुढील कारवाई कामी दोन्ही आरोपीतांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राज कुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत गवळी सो., मा. पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. संदिप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.