जळगावचे रशीद कासमी मजरूह पुरस्काराने सन्मानित* .
*जळगावचे रशीद कासमी मजरूह पुरस्काराने सन्मानित* .
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यात कै.मजूरह सुलतानपुरी यांच्या नावाने विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रत्येक वर्षी मजरूह अकॅडमी जळगाव मार्फत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
२०२२ चा पुरस्कार जळगाव शहरातील उर्दू साहित्य क्षेत्रात अवलोकनीय कामगिरी केल्याबाबत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रशीद कासमी यांना हा पुरस्कार पत्रकार भवन जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा चे अध्यक्ष करीम सलार होते तर प्रमुख अतिथी म्हणून एटीएम चे अध्यक्ष एजाज मलिक, नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी उर्दू विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर एम इकबाल, तर मजरूह अकॅडमी चे डॉक्टर शफिक नाझीम, अब्दुल रशीद पिंजारी व काजी जमीर अश्रफ यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.
*रशीद कासमी पुरस्कार प्राप्त…*
उर्दू साहित्य व गद्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करीत असल्या बाबत जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथील रहिवासी तथा जळगाव शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त शिक्षक रशीद कासमी यांनी आपल्या जीवनात उर्दू साहित्य क्षेत्रात विविध प्रकारे सेवा दिली असून त्यात त्यांनी गद्य विभागासह विविध कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत त्या खास करून विद्यार्थ्यांना उपयोगात येतात त्यांच्या या कार्याचा मजूरह अकॅडमी यथोचित स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन फारुक शेख यांच्या हस्ते गौरव केला.
*कासमी च्या कार्याबद्दल यांनी केले कौतुक*
मीठा करेला या यू ट्यूब चैनल चे प्रमुख मुस्ताक करीमी, मालेगाव येथील डॉक्टर आयाज शाह, भुसावळचे राष्ट्रीय कवी शकील हसरत, जळगावचे कवी अनिस कैफी, एटीएम चे अध्यक्ष एजाज मलिक,जमियत चे प्रमुख हारून नदवी, मणियार बिरादरी चे फारुक शेख व अध्यक्षीय भाषण करीम सालार यांनी केले.
सर्व वक्त्यांनी रशीद कासमी यांच्या कार्याचा उल्लेख केला.
*सत्काराला उत्तर ..* रशीद कासमी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना मजरूह अकॅडमी सोबतच जळगावकरांचे आभार मानले व हा पुरस्कार देऊन मी जरी सरकारी सेवेतून निवृत्त झालो असलो तरी साहित्य क्षेत्रातून निवृत्त झालेलो नाही याची हा पुरस्कार सतत आठवण देत राहील व मी जीवात जीव असेपर्यंत उर्दू साहित्याची सेवा करेल असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी यावल, सुरत, एरंडोल, नशिराबाद, भुसावळ, फैजपूर व मालेगाव येथील नामवंत असे उर्दू क्षेत्रातील साहित्यिक कवी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मजरूह अकॅडमी चे अध्यक्ष डॉक्टर शफिक नाझीम, यांनी केले तर सूत्रसंचालन माइल पालधवी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अकॅडमीचे काजी जमीर अश्रफ यांनी मानले.
फोटो कॅप्शन
रशीद कासमी यांना मजरूह अवार्ड प्रदान करताना फारुक शेख सोबत डावीकडून, एजाज मलिक, अब्दुल करीम सालार, प्रो डॉ एम इकबाल, डॉक्टर शफीक नाझिम,मुफ्ती हारून नदवी, रशीद पिंजारी व जमीर काझी आधी दिसत आहे.