सावदा; लाठ्या, काठ्या, तलवार, बंदुकीच्या वापर; ४० जणांविरुद्ध गुन्हा

सावदा; लाठ्या, काठ्या, तलवार, बंदुकीच्या वापर; ४० जणांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी शाहिद खान
सावदा शहरात २८ नोव्हेंबर कत्तलखान्यानजीक गुरांची गाडी आल्याचे समजल्याने ती बघण्यासाठी आलेल्या मुलांना सुमारे ४० जणांनी लाठ्या, काठ्या, तलवार, आणि बंदुकच्या मागील बाजुने मारहाण केल्याची घटना सावदा शहरात घडली होती. या घटनेप्रकरण २९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, सावदा येथील कत्तलखान्यानजीक गुरांचे वाहन कात्तलीसाठी आल्याचे समजल्याने गावातील काही मुले घटनास्थळी गेले होते.
त्यावेळी एका समुदायाची मुले त्यांना मारहाण करत असल्याच्या निरोप जितेंद्र किसन भारंबे यांना मिळाला. या घटनेची शहानिशा करण्यासाठी जितेंद्र भारंबे घटनास्थळी गेले असता. बिलाल कुरेशी नामक, इसमाने त्यांच्या डोक्या बंदूक लावून बंदुकीच्या मागील भाग त्यांच्या तोंडावर मारला. अशफाक कुरेशी यांनी त्यांच्या पाठीमागून येत त्यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. भारंबे खाली जमिनीवर पडताच बिलाल आणि अशपाक यांच्यासोबत असलेल्या सुमारे ३० ते ४० जणांनी हातातील लाठ्या काठ्या आणि अंगावर मारणं सुरू केली.
जखमी जितेंद्र भारंबे यांच्यावर फैजपूर येथील श्री हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांनी या घटने प्रकरणी बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कदिर कुरेशी, व इतर सुमारे ३० ते ४० जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहे.