पोलिस टाईम्स न्यूज 24 चा गौरव कर्तुत्ववान व्यक्तींचा सोहळा २०२२ संपन्न…

पोलिस टाईम्स न्यूज 24 चा गौरव कर्तुत्ववान व्यक्तींचा सोहळा दिनांक: २०२२ संपन्न…
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे प्रतिपादन गगनबावडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी केले. त्या नाशिक/ मुंबई, येथील पोलिस टाईम्स न्यूज 24 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरव कर्तृत्ववान व्यक्तींचा ह्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी तिसिंगी गगनबावडा तालुका येथे बोलत होत्या… देशभरात चालू असलेल्या घडामोडी आपल्याला घरबसल्या वाचण्यासाठी देण्याचे काम फक्त पत्रकारच करू शकतात त्यामुळे पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे मत गगनबावडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी मॅडम यांनी केले आहे. सन 2021 मध्ये ज्या व्यक्तींनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे, अशा लोकांच्या साठी नाशिक-मुंबई येथील पोलिस टाईम्स न्यूज 24 च्या वतीने गौरव कर्तृत्ववान व्यक्तींचा हा गौरव सोहळा गगनबावडा तालुक्यातील दत्ताजीराव मोहिते-पाटील ज्युनिअर कॉलेजच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या. यामध्ये प्रतिनिधी किरण मस्कर यांना शोध पत्रकारिता हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा गगनबावडा पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी माधुरी परीट मॅडम , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना दिल्ली चे जी एस कांबळे, पोलीस टाईम्स न्यूज चे संपादक, संस्थापक सलीम काझी, व संस्थापक डॉ. अफजल देवळेकर सरकार , डायरेक्टर अभिषेक खोत,एन डी चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक-अध्यक्ष एन डी चौगुले, माझी सभापती बंकट थोडगे या सर्वांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे, कोल्हापूर, सोलापूर,मुंबई, सांगली,नाशिक सह पत्रकार, रमेश डोंगरे,मोहम्मद केडिया, नासिर शेख, रमेश इंगवले, खुदबुद्दीन भाई,उत्तम पाटील, चंद्रकांत पाटील, सुदर्शन पाटील, दिलीप पाटील, शरद कुंभार, राजेश सातपुते,गौतम कांबळे व मान्यवर उपस्थित होते..