कामगारांने केली मालकाच्या २ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक

कामगारांने केली मालकाच्या २ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील एका कंपनीतील काम करणाऱ्या स्टोर कीपरनेच कंपनीची २ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल समाधान पाटील, रा. चुंचाळे ता. यावल जि. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेली माहिती अनुसार जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील त्रिनिटी महालासा दुर्गा सेल्स अँड सर्विसेस नावाची कंपनी आहे. त्याच ठिकाणी विशाल समाधान पाटील हा स्टोर कीपर म्हणून काम करतो. दरम्यान २०२२ ते २०२२ दरम्यान विशाल पाटील यांनी कंपनीच्या काम करीत असताना कंपनीच्या विश्वास संपादन करून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने २ लाख ४३ हजार रुपयांच्या अपहार केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे कर्मचारी पुंडलिक प्रल्हाद लव्हाळे (वय-४०) रा. भागदरा ता. जामनेर जि जळगाव यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोग्य विशाल समाधान पाटील यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करत आहे