महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १४, १७ व १९ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांच्या ४ व्हॉलीबॉल संघांचा घवघवीत विजय*

*महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १४, १७ व १९ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांच्या ४ व्हॉलीबॉल संघांचा घवघवीत विजय*
pपोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड:* आज दिनांक १६ नोव्हेंबर वार बुधवार रोजी म!हाराणी उषाराजे होळकर विद्यालयातील १४, १७ व १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या चार संघांची तालुका स्तरावर घवघवीत यश मिळवून जिल्हा स्तरावर निवड झाली.
त्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संस्थापक शिरीषभाऊ कोतवाल व विद्यालयाचे प्राचार्य श्री ए बी जाधव सर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच यशस्वी खेळाडुंना मार्गदर्शन करणारे जीवन शिंदे सर व के टी जाधव सर यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री राहुलदादा कोतवाल आणि संस्थेचे सचिव श्री डी आर बारगळ सर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होणेकामी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.