ताज्या घडामोडी

साथीदारांच्या मदतीने जावयाने केली सासुच्या घरफोडी; दोघांना अटक

साथीदारांच्या मदतीने जावयाने केली सासुच्या घरफोडी; दोघांना अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदिरजवळ सो मीरा आनंद पाटील या गृहीणी राहतात. त्यांच्या घराच्या गोडावुन मधून ७ नोव्हेंबर चे रात्री ५८ हजार ५०० रुपये किमतीचे तीस वर्ष जुने सोन्याचे दागिने चोरी झाले होते. या घटने प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घराच्या खाली असलेल्या गोडाऊनमधून ३० वर्ष जुने सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या जावयासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
जावयाने साथीदारांच्या मदतीने सासरवाडीच्या गोडाऊन मधून दागिने चोरी केल्याची विविध प्रक्रिया आहेत.
तुषार विजय जाधव पाटील ( वय-२५) रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव, असे जावयाचे तर सचिन केलास चव्हाण ( वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, असे अटक करण्याचे साथीदारांचे नाव आहे.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनापाटील व त्यांचे सहकारी करत होते. सौ. मिरा पाटील व त्यांचे जावयासह त्याच्या साथीदारांना केल्याची माहिती पो.ना किसनराव नजन पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे तपास कामी पोलीस अंमलदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, विजय श्यामराव पाटील, दिपक शिंदे, राहुल बैषाणे आदींनी पथक तयार करण्यात आले. तुषार जाधव यास ताब्यात घेत चौकशी केली त्याने हा गुन्हा चौघा साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड केले. त्याच्यासह सचिन कैलास पाटील याला देखील अटक करण्यात आली आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!