अवैध वृक्षतोड प्रकरण: सावदा पीडब्ल्यूडी विभागा कडून थंडबस्त्यात!

अवैध वृक्षतोड प्रकरण: सावदा पीडब्ल्यूडी विभागा कडून थंडबस्त्यात!*
“तसेच सदरील रस्त्यावरील वृक्षांची कत्तल व विक्री सह नवीन उच्च दाब वीज वाहिण्या व पोल लावणेसाठी कायद्याने विहित केलेल्या पद्धतीचा वापर सावदा सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभाग व वनविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी नियमानुसार या प्रकरणी कार्यालयीन बाबी देखील पूर्ण केलेल्या नाही.हे मात्र खरे आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी मोहसिन शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अनेक तरुण विविध प्रकारचे लाखो रुपये किमतीचे जिवंत वृक्ष झाडे राजेरोसपणे सदरील विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने की काय?मात्र विनापरवानगी कत्तल करून त्यांची विक्री करण्याचा गोरख धंदा ऑक्टोबर महिन्यात एका जागृत वृक्षप्रेमी यांनी तक्रार करून चव्हाट्यावर आणलेला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सावदा ते सावखेडा दरम्यान ३३ के.व्हीच्या नवीन विद्युत वाहिण्या टाकण्यासाठी सावदा वीज वितरण विभागाकडून सावदा ते सावखेडा पर्यंत असलेल्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले विविध प्रकारचे तरुण वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली.कत्तल केलेल्या वृक्षात कडुलिंबाचे झाडांचे प्रमाण अधिक होते.या झाडांची सरासरी २० लाखात विक्री झाल्याची चर्चा आजही नागरिकांमध्ये सुरू असून सदर झाडांची बेकायदेशीर कत्तल करणारे कोण?तसेच यांची दिवसाढवळ्या वाहनात उचलून भरून नेणारे कोण?यांची खरेदी व विक्री करणारे कोण?तसेच अवैधरित्या सदरील तरुण वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल मुळे थेट पर्यावरणाला व झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या धोरणाला बांधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकाऱ्याकडून कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई अध्याप न झाल्याने”तेरे भी चुप मेरी भी चुप” सारखा सुरू असलेल्या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांची सोयस्कर रित्या की काय?मात्र घेतलेली भूमिका थेट चोरांना पाऊल खुणा नष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या अदृश दिशेने मार्गस्थ करीत आहे.तरी या सदरील दखलपात्र प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभाग,वीज वितरण विभाग व वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच सदर प्रकरणाची काही वृक्षप्रेमी कडून लवकरच पुराव्यानिशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाईल.व लवकर न्याय न मिळाल्यास कायदे तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई सुध्दा करण्यात येईल.अशी माहिती एका वृक्ष प्रेमींने दैनिक नवराष्ट्र प्रतिनिधीस दिली.