बनावट चेक, बनावट बिले एकास फरार संशयित अटक
बनावट चेक, बनावट बिले
एकास फरार संशयित अटक
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात स्मृति केमिकल्स आणि सुबोनिया केमिकल्स या नावाची कंपनीमध्ये लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करून सह्या करणाऱ्या ऑफिस बॉयसह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील एका फरार संशयती अटक करण्यात आली आहे.
अविनाश कोमल पाटील, रा. पिंपराळा असे अटक करण्यात आलेल्य संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एकुण ९ पैकी चौघांना यापुर्वी अटक करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरात सुबोध चौधरी आणि त्यांच्या भाऊ सुनील चौधरी, यांची अनुक्रमे समृद्धी केमिकल्स आणि सुबोणीय केमिकल्स या नावाची कंपनी आहे. समृद्धी केमिकल्स मध्ये विशाल पोपट डोके हा ऑफिसबॉय म्हणून कामाला होता. विशाल डोके यांनी दोन्ही कंपन्याचे चेकवर बनावट सह्या करून एकुण ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. बनावट सह्यंचे चेक बँकेतून वटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला अविनाश कोमल पाटील हा पिंपराळा येथे आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहा फौ. अतुल वंजारी, किशोर पाटील, संदीप धनगर, आदींनी त्याला ताब्यात घेत अटक केली.
अटकेतील अविनाश पाटील यास. न्या. जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली. मेगा खैरनार, रा. मारुती पेठ जळगाव, संजय छेडा, रा. गणेश कॉलनी जळगाव, पुनमचंद पवार रा. सिंधी कॉलनी जळगाव, आणि विजय सैंदाणे रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांच्या शोध सुरू आहे