धरणगाव येथील डोंगर पीर बाबा दर्गा ची ७ दिवसात पुनर स्थापना करा अन्यथा तीव्र आंदोलन- प्रशासकीय अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करा- धरणगाव नागरिकांची जिल्हाधिकारी कडे मागणी*
*धरणगाव येथील डोंगर पीर बाबा दर्गा ची ७ दिवसात पुनर स्थापना करा अन्यथा तीव्र आंदोलन- प्रशासकीय अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करा- धरणगाव नागरिकांची जिल्हाधिकारी कडे मागणी*
प्रतिनिधी शाहिद खान
धरणगाव येथील हजरत सय्यद अहमद शहा कमाली रमतुल्ला डोंगरपुर बाबा यांची गट क्रमांक १२४८/२ मध्ये १९२३ पासून दर्गा आहे.
त्या वेळ पासून हिंदू मुस्लिम समाजाचे भक्त त्या ठिकाणी आस्था प्रदर्शित करीत असतात.
१२४८/१ हे शेत्र गुरुचरण साठी राखीव आहे त्या ठिकाणी डोंगरपुर बाबांचा काही एक संबंध नाही परंतु प्रशासनाने जिल्हाधिकारी जळगाव यांचे १३ सप्टेंबर १९ चे आदेश व अप्पर आयुक्त नाशिक यांचे ११-१०-२२ चे आदेशाच्या नावाखाली गट क्रमांक १२४८/२ मधील दर्गा अतिक्रमण खाली दाखवून संपूर्णपणे नेस्त नाबुत केलेली आहे व समाजाच्या असलेला व श्रद्धेला पायदळी तुटविले आहे.
*प्रशासनाची बेकायदेशीर कृती*
प्रशासन यांनी राजकीय दबावाखाली भारतीय संविधान व घटनाबाह्य कार्य केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य वकफ अधिनियम १९९५ तसेच केंद्रीय कायदा वर्कशीफ( स्पेशल प्रोविजन ॲक्ट१९९१) चे कलम ४ व ७ चे सुद्धा उल्लंघन केलेले आहे एवढेच नव्हे तर मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वकफ मंडळ औरंगाबाद यांनी दिनांक १ नोव्हेंबर २२ रोजी वक्फ प्रॉपर्टी चे संरक्षण करण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार धरणगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी धरणगाव यांना आदेश देऊन सुद्धा त्या आदेशाची अवहेलना नव्हे तर त्या आदेशाला पायदळी तुटवत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण आस्था व श्रद्धेचे प्रतिक असलेले हजरत अहमदशाह कमाली शाह बाबा दर्गाची पूर्णपणे
भूई सपाट केलेले आहे.
सदर प्रकरणी धरणगाव येथील १५ मोहलला मधील सुमारे २०० ते २५० तरुणांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची ३ नोव्हेंबरला जळगाव येथे प्रत्यक्ष भेट येऊन त्यांना जळगाव जिल्हाधिकारी यांचे आदेश, अप्पर आयुक्त नाशिक यांचे आदेश, वक्फ मंडळ औरंगाबादचे आदेश हे सर्व कागदपत्र दाखवून प्रशासनाने कशाप्रकारे घटनाबाह्य व बेकायदेशीर कृत्य केले आहे हे कागदोपत्री दाखविले व ज्यांनी हे गैर कृत्य केले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हास न्याय द्यावा. तसेच दर्गा ची येत्या सात दिवसात पुनस्थापना करून मिळावी अन्यथा आम्हास न्यायालयासोबतच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल अशी तक्रार वजा निवेदन दिलेले आहे.
*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*
जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरदरीचे फारुक शेख,डोंगर पीर बाबा ट्रस्टचे अध्यक्ष रफिक कुरेशी, सचिव नदीम काझी, रहमान शाह, अहमद पठाण, राजू भाई बेलदार, अश्फाक शेख, अनिस शेख ,जमशेर शेख, इमरान शेख ,मुस्तक मोमीन, अल्ला बक्ष, मुजावर, जाहीर शेख, वसीम खान कुरेशी, साजिद खान कुरेशी, एजाज कुरेशी, मोहम्मद अस्लम, वकार मोहम्मद ,सादिक हासिफ, अमजद खान, बेलदार सज्जाद अली, सय्यद, सलमान पठाण, शेख बाळू, रफिक शेख, मोमीन,सलमान अरबाज, पठाण ,शेख मुस्ताक, रजा मणियारअशा सुमारे १७३ लोकांचे स्वाक्षरी असलेले तक्रार – निवेदन देण्यात आले
*जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन*
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिष्टमंडळाच्या भावना समजून घेऊन तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्र व आदेश बघून त्यांनी आपण कायदेशीर रित्या योग्य त्या न्यायालयातून आदेश घेऊन या तसेच आपली आस्था व श्राद्ध हि बाब लक्षात घेता पूजा अर्चा व उर्स साठी माननीय पालकमंत्र्यांच्या सोबत मीटिंग घेऊन यातून काही कायदेशीर मार्ग काढता येईल का ? याच्यावर सुद्धा विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आपण श्रद्धेला ठेच पोचली असता जो संयम व शांतता प्रस्थापित केली ते अत्यंत चांगले कृत्य आहे .भविष्यात सुद्धा आपण शांतता व कायदेशीर मार्गाने लढा असे आव्हान केले.
फोटो
१) जिल्हा अधिकारी यांना कागदपत्रे दाखविताना
२) जिल्हा अधिकारी यांचेशी चर्चा करतांना
३) जिल्हा अधिकारी यांना निवेदन देताना रफिक कुरेशी, नदीम काझी, फारुक शेख, आदी दिसत आहे