*जुन्या आठवनींना उजाळा २०००/२००१. १०वी ची ब्याच एकत्र येऊन शिक्षकांसोबत स्नेहमेळावा संपन्न*

*जुन्या आठवनींना उजाळा २०००/२००१. १०वी ची ब्याच एकत्र येऊन शिक्षकांसोबत स्नेहमेळावा संपन्न*
दानोळी प्रतिनिधी : संदीप चौगुले
दानोळी हायस्कूल दानोळी या माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी, व
आपल्याला घडवणारे शिक्षक,शिक्षिका
या सर्वांनी मिळून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला तब्बल 21वर्षानंतर एकत्र आल्यामुळे सर्वजण भाऊक झाले शिक्षक सुद्धा भारावून गेले प्रत्येक मित्र काय करत असेल आपण या निमित्ताने का होईना एकत्र येऊया या हेतूने त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले
या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सुख-दुखांना वाट मोकळी करून दिली शिक्षकानंसोबत सुधा मनमोकळे पणाने बोलत सर्वांनी आपापल्या तब्येतीची विचारपूस केली
यावेळी सचिन माने यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट दिला त्यामुळे त्याचं सर्व शिक्षकांनी कौतुक केलं आणि सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले कोरोना काळातील प्रसंग सुद्धा सांगितले.
तसेच स्नेहमेळावा पार पाडण्यासाठी सचिन शिंदे,सचिन माने,जयदीप पारज,संजय साळोखे, बंटी बोरचाटे,उदय बिनीवाले,बंडू चव्हाण यांनी अथक प्रयत्न केले.
स्वागत विद्या कल्याणी यांनी केले सूत्रसंचालन सचिन शिंदे व माया पाटील यांनी केले.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक कुबेर हिंगलेजे सर,दिनकर माने सर,बापुसो चंदोबा सर, ए आर माने सर, सि एन कवंदे सर, एस डी पाटील, एम डी पाटील, यू एन पाटील,यांच्यासह निवृत्त शिपाही ज्येष्ठ गंगाधर क्षीरसागर मामा यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.