ताज्या घडामोडी

तरुणांचा खुन करणारे तीन आरोपी एमआयडीसी पोलिसांनी अटक व दोन फरार

तरुणांचा खुन करणारे तीन आरोपी एमआयडीसी पोलिसांनी अटक व दोन फरार

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरात शिरसोली नाका तांबापुरा परिसरात दिनांक २५/१०/२०२२ रोजी रात्री ०९.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरात शिरसोली नाक्याजवळ सदगुरु कॉलनी येथे गुरुचरणसिंग बावरी यांचे घरासमोर मोहनसिंग जगदीश सिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी सर्व राहणार शिरसोली नाका सदगुरु कॉलनी जळगाव यांनी दिनांक २४ / १० / २०२२ रोजी फटाके फोडण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने संजयसिंग प्रदिपसिंग टाक याच्या पोटावर व इतर ठिकाणी धारदार चाकुने वार करुन त्यास जिवे ठार मारलेले असुन प्रदिपसिंग तेजसिंग टाक, करणसिंग प्रदिपसिंग टाक, बग्गासिंग आयासिंग टाक, बलवंतसिंग तेजसिंग टाक यांचेवर दगडफेक करुन त्यांना जखमी केले आहे.
जसवंतसिंग आयसिंग टाक (वय३२) वर्षे, व्यवसाय- वेल्डींग काम रा. शिरसोली नाका सदगुरु कॉलनी,
मी वरील ठिकाणी वडील आयासिंग, आई अत्तरकौर, पत्नी ललिताकौर व दोन मुले अशांसह राहतो व वेल्डींग काम करतो. माझ्या घराशेजारीच माझे काका प्रदीपसिंग हे त्यांची पत्नी पिंकीकर मुले ) अनिलसिंग २) संजयसिंग ३) करणसिंग अशांसह राहतात. तसेच घराजवळच जगदीश सिंग बावरी हे त्यांची पत्नी सतकौरसिंग, मुले मोहनसिंग, मोनूसिंग, सोनुसिंग अशांसह राहतात. जगदीशसिंग बावरी व त्याचे मुले यांना धोया, घरफोड्या असे गुन्हे करण्याची सवय असून ते नेहमी असे गुन्हे करुन आमचे गल्लीत दादागीरी करीत असतात.

दिनांक २४ / १० / २०२२ रोजी रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास मोनुसिंग बावरी व मोहनसिंग हे आमचे गल्लीत फटाके फोडत होते व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर तसेच गल्लीत राहणारे लोकांचे घरावर फटाके फेकत होते. माझा चुलत भाऊ संजयसिंग टाक याने त्यांना असे न करण्याबाबत समजविले असता त्यावेळी त्यांचेत वाद झाला होता.
दिनांक २५/१०/२०२२ रोजी रात्री ०९-०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास मी तसेच कालुसिंग गुरुचरणसिंग बावरी, गुरुदेवसिंग दिलीपसिंग बावरी व माझा चुलत भाऊ संजयसिंग प्रदिपसिंग टाक असे आमचे गल्लीतील गुरुचरणसिंग शेरसिंग बावरी यांचे घराजवळ असलेल्या लोखंडी टेबलवर बसुन गप्पा मारीत असतांना मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी हे दिनांक २४/१०/२०२२ रोजी झालेल्या फटाके फोडण्याच्या कारणावरुन संजयसिंग टाक यास मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत आमच्या दिशेने आले त्या वेळी त्या दोघांच्या हातात धारदार चाकु होते. ते आमचे जवळ आले त्यावेळी संजयसिंग टाक हा उठुन उभा राहीला असता मोहनसिंग व मोनुसिंग या दोघांनी संजयसिंग टाक याचे पोटावर व अंगावर इतर ठिकाणी धारदार शास्त्रने वार करुन त्यास जखमी केल्याने तो त्याच ठिकाणी जमीनीवर खाली पडला. आम्ही घाबरुन सदर ठिकाणावरुन बाजुला निघुन गेलो. त्याचवेळी सदर ठिकाणी सोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौरसिंग जगदीशसिंग बावरी हे तिघे देखील त्यांच्या मागोमाग सदर ठिकाणी आले. संजयसिंग जखमी अवस्थेत पडलेला असल्याने व मोठमोठ्याने आरडाओरडचा आवाज झाल्याने त्याठिकाणी प्रदिपसिंग तेजसिंग टाक, करणसिंग प्रदिपसिंग टाक, बग्गासिंग आयासिंग टाक, बलवंतसिंग तेजसिंग टाक हे आले असता त्यांचेवरसुध्दा सोसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरोसिंग बावरी, सतकीरसिंग जगदीशसिंग बावरी यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करुन दगडफेक करुन प्रदिपसिंग तेजसिंग टाक, करणसिंग प्रदिपसिंग टाक, बग्गासिंग आयसिंग टाक, बलवंतसिंग तेजसिंग टाक यांना जखमी केलेले आहे. त्यात त्यांना डोक्यावर पोटावर जखमा झालेल्या आहेत. तसेच बग्गासिंग हे मोहनसिंग व मोनुसिंग यांना समजवत असतांना त्यांनी बग्गासिंग यांनादेखील जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे पोटावर चाकु मारुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन जखमी केलेले आहे. सदर घटना घडल्यानंतर सदर ठिकाणी लोकांची गर्दा जमा झाल्याने पोलीस आल्याने मोहनसिंग, मोनसिंग, सोनुसिंग जगदीशसिंग, सतकौर असे सर्वजण सेथून निघुन गेलो. त्यानंतर संजयसिंग व त्यासोबत जखमी झालेले इतर लोकांना औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे नेले असता संजयसिंग प्रदिपसिंग टाक (वय -१९ ) वर्षे यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले असुन इतर जणांवर ओषधोपचार चालु आहेत.
दिवाळीत घडल्यामुळे व गुन्हा रेकॉर्डवरील आरोपींनी केला असल्यामुळे त्यांना तात्काळ शोधणे आदेश पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिला होता त्याप्रमाणे सदर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता हेदेखील हजर झाले होते त्यांनी केलेल्या सूचना नुसार रात्रभर तांबापुर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसन पाटील व पोलीस निरीक्षक एमआयडीसी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून तीन आरोपी यांना ताब्यात घेतले होते व त्यांना गुन्ह्यागामी अटक करण्यात आली होती आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मोनोसिंग याच्याविरुद्ध यापूर्वी २० गुन्हे दाखल असून मोहनसिंग यांच्या विरुद्ध १२ गुन्हे दाखल आहे व त्यांचे वडील जगदीश सिंग यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहे तिघेंना त्यांच्याविरुद्ध गु.र.नं ७६९/२०२२ भाऊ.द.वि कलम ३०२,३०७,३२६,१४७,१४८,१४९, दाखल झाला आहे,
त्यांना काल रोजी न्यायमूर्ती सोनवणे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे दत्तात्रय बडगुजर करीत आहे

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!