अतिग्रे तालुका हातकणंगले येथे राज ढाबा शेजारी हॅपी नावाची ट्रॅव्हल्स व ट्रक यांचा अपघात, ट्रक क्र MH14 DM7891 हा ट्रक सांगली हून कोल्हापूर कडे जात असताना पाठीमागून हॅपी नावाची ट्रॅव्हल्स क्र ap 39 v 6129 ने धडक दिली त्यामध्ये ट्रॅव्हलर्स ड्रायव्हर गंभीर जख्मी झाला आहे त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा नोंद हातकणंगले पोलीस ठाणे मध्ये करण्यात आला आहे अधिक तपास हातकणंगले पोलिस स्टेशन चे पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे करत आहेत जखमी चालकाचे नाव संगमेश्वर उडणपुरे राहणार हैद्राबाद , शहानूर हुसेन सो जमादार राहणार कागल तसेच या अपघाताच्या शेजारी एसटी अनावर झाल्यामुळे हाइवे शेजारील असलेल्या ओढ्यात मध्ये बस पलटी झाली आहे एसटी मध्ये एकूण प्रवासी 32होते त्यापैकी तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बाकीचे काही प्रवाशांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत एसटी चालकाचे नाव , राजेंद्र मोहन वणवे , राहणार अहमदनगर, एसटी कोल्हापूर डेपो मधील आहे, एसटी मधील थोडक्यात प्रवाशांची नावे , प्रवीण शंकर हेरवडे, निलेश जगन्नाथ भोसे, कुमार बिराप्पा पाडेगाव रा दिग्रज, जखमींची नावे असुन थोडक्यात घटनास्थळावरची माहिती आहे हातकणंगले ते शिरोली पर्यंतचा रोड जीव घेणे रस्ता ठरत आहे कारण या रस्त्यामध्ये खड्डे जास्त ने रस्ता कुठे आहे हा दिसत नाही या पद्धतीने नागरिकांचे जीव प्रशासन किती घेणार आहे असा सवाल नागरिकांच्यातून विचारण्यात येत आहे