नाल्याच्या पाण्यातुन मोटार चोरी करणारे चोर गजाआड
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव दिनांक: ०७/१०/२०२२ दिनांक २९/०९/२०२२ रोजी चे संध्याकाळी ०७,३० चे संजय धनसींग परदेशी वय ४५ वर्षे, धंदा शेती रा. रायपुर ता. जि. जळगाव हे त्यांचे सोबत वसंत सिताराम धनगर, विजय मोहन परदेशी, दिलीप कड्डु धनगर, दिलीप शालीग्राम परदेशी असे ग्रामरक्षक दलातील लोक पायी शेत शिवारात चोरी होवु नये याकरीता फिरताना त्यांना कंडारी नाल्याजवळ एक मोटार सायकल उभी दिसली होती. म्हणून त्यांना संशय आल्याने त्यांनी पाहिले असता संजय परदेशी यांच्या शेताजवळ असलेल्या कंडारी नाल्याच्या पाण्यातुन दोन इसम पाण्याची मोटार काढतांना दिसले होते. त्यावेळी त्यांना हे पकडण्यास गेले असता दोन इसम अनोळखी इसत पळुन गेले होते. पळुन जाताना त्यांना त्यांन संजय धनसिंग परदेशी यांच्या मालकीची १) १२,०००/- रु. किंमतीची लक्ष्मी कंपनीची ईलेक्ट्रीक मोटर, २) २,०००/- रु. किंमतीचे LTLK कंपनीचे स्टार्टर, ३) २,०००/- रु. किंमतीची कॉपर ची काळया रंगाची ४० फुट अंदाजे असा एकुण १६,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हे घेवुन गेले होते म्हणुन सदर बाबतीत दि. २९/०९/२०२२ रोजी संजय धनसिंग परदेशी यांनी फिर्याद दिल्याने एम आय डी सी ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचे चोर हे चोरी करतावेळी वेळी त्यांची बजाज कंपनीची डिस्कवर गाडी क्र. MH ४१ ७७१२ हि घटनास्थळी सोडुन गेले होते. त्या मोटार सायकलच्या आधारावर पो नि सो प्रताप शिकारे यांना गोपनिय माहिती मिळाली होती की, सदरची चोरी हि संजय नामेदव भिल व राहुल युवराज बागडे उर्फ गोलू यांनी केली आहे. बाबतची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांचा शोध सुरू होता. चोरी केल्यापासुन ते गाव सोडुन कोठेतरी निघुन गेले होते. संजय नामदेव भिल वय ४० वर्ष रा. कंडारी हा गावात आल्या बाबतची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर कंडारी गावात जावुन त्यास स. फो/अतुल वंजारी, पोहेकॉ गफार तडवी, पोकों मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, किशोर पाटील, होमगार्ड विजय कोळी आशांनी त्यास ताब्यात घेतले होते. त्यास गुन्हयाकामी अटक करण्यात आली असून त्यास आज रोजी न्यायमुर्ती जे एस केळकर मॅडम यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा • दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सरकार तर्फे भारती निकम यांनी कामकाज पाहिले. सदरचा गुन्हा ग्रामसुरक्षा दल यांच्या मदतीने उघडकीस आला असून पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी ग्रामसुरक्षारक्षक यांचे अभिनंदन केले आहे.