
नाशिक – मुंबई नाका परिसरात ऐन सणासुदीच्या काळात बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव भारतीय चलनाच्या पाच लाखांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित इडली विक्रेतला अखेर पोलिसांनी अटक केली.
मुंबईनाका परिसरातील हॉटेल छानच्या मागील परिसरात बनावट पद्धतीने छापलेल्या नाेटांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे भारतनगर परिसरात सापळा रचून संशयित मलायारसन मदसमय याला ताब्यात घेतले. संशयिताची सहायक निरीक्षक के. टी. रौंदळे यांनी राजपत्रित आधिकाऱ्यां समोर अंगझडती घेण्याचा प्रयत्न करताच त्याने नकार दिला.
त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत उपनिरीक्षक बाळू गिते यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या २४४ व पाचशे रुपयांच्या ४० बनावट नोटा आढळून आल्या. तसेच ३,३०० रुपयांची रोकड संशयित कडे मिळाली.
दरम्यान, मुंबईनाका पोलिसांत बनावट नाेटा बाळगणे, बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या खऱ्या असल्याचे भासवून वापरणे व बाळगल्या. मलायारसन मदसमय (रा. ३३, व्यव. इडली व्यवसाय, रा. ३९ तमिळनाडू) असे संशयिताचे नाव आहे.प्रकरणी संशयिताविरोधात मुंबई नाका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.