स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट आणि जिजाऊ ग्रुप यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दांडिया उत्सवाला येवलेकरांचा जोरदार प्रतिसाद लाभला
स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट आणि जिजाऊ ग्रुप यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दांडिया उत्सवाला येवलेकरांचा जोरदार प्रतिसाद लाभला
नवरात्रौत्सव आणि गरबा, दांडिया यांचे समीकरणच आहे. यामुळे नवरात्रौत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया उत्सव येवला येथील रामगीत लॉन्स ला देखील मोठ्या प्रमाणात खेळण्यात आला. विशेषत: तरुण आणि जेष्ठ आशा दोन्ही महिला मंडळी यात आघाडीवर होत्या. कोव्हिडच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त नवरात्रौत्सवामुळे सगळ्या महिला न मध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.
घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे पहिल्या माळेला माजी नगरसेविका मा. उषा ताई शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला तसेच तिसऱ्या माळेला ” *माझ्या नवऱ्याची बायको या tv मालिकेतील स्टार सेलेब्रिटी कलाकार यांच्या सोबत महिलांनी दांडिया खेळण्याचा आनंद घेतला*.
*शिवाय स्वरतरंग ऑर्केस्ट्रा यांच्या गीतामुळे कार्यक्रमात रंगत आली*
तसेच या महोत्सवात विविध स्पर्धा घेऊन त्यांचे देखील पारितोषिक वितरण करण्यात आले.
तब्बल दोन वर्षांनंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात मनमुराद गरबा-दांडिया खेळला गेला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये तसेच गरबा प्रेमींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गरबा खेळण्यासाठी विविध गाण्यांचीही निवड करण्यात आली आहे. यात गुजराती, हिंदीसह विविध भाषांमधील नव्या-जुन्या गीतांचा समावेश आहे. ‘घुंघट में चाँद होगा…’, ‘ढोली-तारो ढोल बाजे…’, ‘मै तो भूल गयी बाबूल का देस..’ यांसह विविध गीतांचा समावेश केला गेला.
सर्व धर्माच्या महिलांसाठी हा दांडिया महोत्सव खुला करण्यात आला असल्याचे
स्मार्ट इंडिया इन्स्टिट्यूट च्या संचालिका प्राध्यापिका ऍड. सौ तेजश्री लासुरे मॅडम यांनी सांगितले
महिलांच्या व मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे प्राध्यापिका ऍड. सौ तेजश्री लासुरे मॅडम यांनी सांगितले.
त्यांना या कार्यक्रमात सौ प्रिया वरपे, अर्चना लगड, नर्गिस शेख, धनश्री जाधव, सुमती आगवन आदी महिलांचे सहकार्य लाभले सदर उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहेत ,लासुरे मॅडम & लासुरे सर यांनी यापुर्वि सुद्धा युथ ईन्सपीरेशन कॅम्प चे आयोजन केले होते. या व्यातरिक्त सुद्धा स्मार्ट ईंडीया इंन्सीटीट्युट अशा अनेक उपक्रमांच आयोजन वर्षभर करत आसते. लासुरे सर व मॅडम यांच्या स्मार्ट ईंडीया इंन्सीटीट्युट मध्ये देखिल विद्याथ्यांन साठी देखील नवनविन उपक्रम आयोजीत केले जातात