
जळगाव शहरात दि. 01/10/2022 रोजी जाकिर बिस्मील्ला बागवान यांच्या मालकिची प्रवासी वाहतुक रीक्षा क्र. एमएच 19 जे 7224 ही चोरी झाल्याबाबतचा एमआयडीसी पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात दोन आरोपी 1) अनिल रमेश चौधरी, 2) मोहसीन शहा सिकंदर शहा यांना अटक करण्यात आली होती. त्यांचेकडुन 40,000/- रुपये किंमतीची प्रवासी रीक्षा क्र. एमएच 19 जे 7224 ही हस्तगत करण्यात आली आहे. व सदर गुन्हयातील तिसऱ्या आरोपी रीजवान उर्फ काल्या शेख गयासोद्दीन शेख रा अजमेरी गल्ली तांबापुर जळगाव हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तो गावात आल्याबाबत मा. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गोपणीय माहीती मिळाल्यावरुन सफ. अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, मुकेश पाटील अशांनी त्यास ताब्यात घेवुन तपासी अधिकारी सफौ. अतुल वंजारी यांनी अटक केली आहे. त्याचेवर एमआयडीसी पोस्टे ला एकुण 20 गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. दि. 05/10/2022 रोजी त्यास मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे