रजत एज्युकेशन सोसायटी हुपरी यांच्यावतीने रास दांडिया उत्साहात संपन्न
हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

हुपरी येथील रजत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रास दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमा मध्ये लहान मुलांसोबतच पालक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते कार्यक्रमात सातवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले त्यामध्ये देवीचे नवदुर्गा रूपाचे दर्शन घडवून दिले विशेषता पालकांना प्रो्साहन मिळावे म्हणून सर्वात उत्कृष्ट जोडीदार स्पर्धा देखील घेण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या नगरसेविका सौ लक्ष्मीबाई साळोखे उपस्थित होत्या उत्कृष्ट जोडीदार स्पर्धेचे बक्षीस व प्रशस्ती पत्र त्याच्या हस्ते देण्यात आले , कार्यक्रमाला अनेक मान्यवरानी उपस्थिती दर्शविली होती त्यामध्ये रजत एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन श्री दीपक गाठ सर, संचालिका देवयानी माळी मॅडम, संचालक प्रकाश चिटणीस सर,प्राचार्या श्रुती मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते