
शिये ता. करवीर याठीकाणी यशवंत क्रांती संघटनेच्या शाखेची स्थापना अध्यक्ष मा. श्री. संजय वाघमोडे, शिये गावचे नूतन सरपंच सौ शितल मगदूम, करवीर तालुका अध्यक्ष बाळासो कोळेकर, राधानगरी तालुका अध्यक्ष सुनील शेळके,वाळवा तालुका अध्यक्ष महेश गावडे महाराज जिल्हा संघटक अनिल बनकर जिल्हा सरचिटणीस, राम कोळेकर , मा.जि.प.सदस्य जयसिंग काशिद आप्पासो सिसाळ उपसरपंच प्रभाकर काशिद शिवाजी रानगे यांच्या हस्ते व गावातील, सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य,यांच्या उपस्थितीत ढोलाच्या गजरात करण्यात आली.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे साहेब म्हणाले की यशवंत क्रांती संघटनेची स्थापना ही गोरगरीब मेंढपाळ व धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी करण्यात आली आहे यशवंत क्रांती संघटनेने मेंढपाळ व डंगे धनगर यांच्यासाठी केलेलं काम बघूनच समाजातूनच उठाव होऊन गावोगावी मेंढपाळ हे समाज बांधवांना एकत्र करून यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा काढून यशवंत क्रांती संघटना बळकट करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळांना , चराऊ कुरणे तसेच मेंढपाळ व शेळ्या मेंढ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत मेंढपाळांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या मेंढ्यांची नुकसान भरपाई ही संघटनेमार्फत मिळवून दिली जात असल्याने मेंढपाळांच्यात संघटनेबद्दल सहानुभूती व समाधान असल्याने मेंढपाळ स्वतः समोर येऊन यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा स्थापन करत आहेत याबद्दल मेंढपाळांचे मनपूर्वक आभार. करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी संघटनेने केलेले काम सांगून संघटना समाजाच्या हक्कासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहील असे सांगितले यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वाघमोडे साहेब हे मेंढपाळ व गोरगरीब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात आज त्यांच्या मुळेच माझ्यासारख्या धनगरवाड्यावर राहणाऱ्या तरुणांना तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे नाहीतर आजपर्यंत आमच्याकडे फक्त मतदान करा म्हणून सांगण्यासाठीच नेते येत होते.परंतु आपल्या हक्कासाठी लढायला वाघमोडे साहेब यांनी शिकवले.तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी संघटनेच्या शाखा स्थापनेला शुभेच्छा देऊन यशवंत क्रांती संघटनेच्या निमित्ताने शिये गावातील धनगर समाज गट तट विसरून यशवंत क्रांती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेला पाहून मनाला आनंद झाला. असेच काम यशवंत क्रांती संघटनेने करावे असे आवाहन त्यांनी केले. मेंढपाळ व यशवंत क्रांती संघटनेचे चाललेले काम अतिशय चांगले काम आहे. असे सांगून ग्रामपंचायतच्या वतीने संघटनेसाठी व मेंढपाळांच्यासाठी जे सहकार्य लागेल ते सरपंच म्हणून मी करेन असे नुतन सरपंच शितल मगदूम म्हणाल्या.शाखा संपर्कप्रमुख सरदार शिसाळ म्हणाले की यशवंत क्रांती संघटनेची शाखा ही कोणत्याही राजकारण करण्यासाठी काढण्यात आलेली नसून धनगर समाजाच्या व मेंढपाळ यांच्या हक्कासाठी तसेच संघटनेच्या माध्यमातून आमचे अधिकार आम्हाला मिळवायचे आहेत आम्ही आता एकत्र येत आहोत आणि इथून पुढेही संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजाच्या व मेंढपाळांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू प्रास्ताविक प्रकाश सिसाळ (सर)यांनी व आभार सौ. सुनिता रानगे मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरदार सिसाळ, शाखा संपर्क प्रमुख,श्री सुरेश सिसाळ अध्यक्ष, श्री संकेत रांनगे उपाध्यक्ष, नितीन देसाई खजिनदार, अमर सिसाळ, सेक्रेटरी सुनील सिसाळ संघटक योगेश माने संघटक या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देण्यात आली. कार्यक्रमाससंतोष शिसाळ आप्पासो शिसाळ अनिल गावडे तानाजी रानगे मारुती रानगे नितीन शिसाळ सचिन माने बाळू माने दीपक शिसाळ शंकर रानगे ज्येष्ठ वयस्कर मंडळी मंगू शिसाळ संतराम शिसाळ सर्जेराव शिसाळ सातापा माने राजाराम माने सूर्याप्पा रानगे अजित वाघमोडे, सर्व मेंढपाळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते