भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमीत्त तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांच्या…….

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमीत्त तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसापासून गांधी जयंती पर्यंत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह आयोजित केलेला असुन या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आज भारतीय जनता पार्टी विनकर प्रकोष्ट,महाराष्ट्र प्रदेश व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड यांचे संयुक्त विद्यमाने केंद्रिय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने हातमाग कारागिरांसाठी व असंघटीत कामगारांसाठी केंद्रिय आरोग्य व कुटुब कल्याण राज्यमंत्री मा.ना.भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनानुसार
ईश्रम कार्ड
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नोंदणी चे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबीराला येवला शहरातील व तालुक्यातील पैठणी कारागिर व नागरीक मोठ्या उपस्थित होते.
श्री. चौडेश्वरी माता मंदिर, मधली गल्ली, येवला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन विनकर प्रकोष्ठचे प्रदेश सहसंयोजक मनोज दिवटे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलतांना मनोज दिवटे यांनी ई श्रम कार्ड व प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सर्व असंघटीत कामगारांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. मा.नरेंद्रजी मोदी यांच्या आठ वर्षाच्या कालावधीत अनेक योजना ह्या समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता,समाजातील असमतोल दूर करून गोर गरीब,वंचीत घटकाचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून तयार केल्याचे आपल्या लक्षात येते.केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या नाशिक विभागाच्या संचालिका श्रीमती सारीका डफरे यांनी या वेळी विवीध शासकीय योजनांची माहीती दिली.श्रमयोगी मानधन योजनेत वय वर्ष 18ते 40 असलेल्या पैठणी विनकरांनी नोंदणी करून कमीत कमी 55 रूपये व जास्तीत जास्त 200रूपये मासिक हप्ता भरून सहभागी होण्याचे आवाहन केले. जेष्ठ नेते प्रमोद सस्कर,प्रदेश सदस्य बाबासाहेब डमाळे,शहराध्यक्ष तरंग गुजराथी,आदीनी आपले विचार व्यक्त काले. यावेळी मनोज सगम,सचिन करंजकर यांच्या विनकर प्रकोष्ठच्या शहर उपाध्यक्षपदी व मनोज पैंजने यांच्या सरचिटणीस पदी निवडीचे पत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.कार्यक्रमाला सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर , उपाध्यक्ष कुनाल भावसार,जितेन्द्र पहीलवान,विनकर प्रकोष्ठचे पंकज पहिलवान ,संतोष सासे ,आण्णा पात्रे , शिरीष पेटकर ,बाबुराव खानापुरे ,गणेश फासे ,नारायण देखणे ,अर्चना रसाळ ,सुनिता सहित ,किशोरी व्यवहारे, अश्विनी देहाडे ,मनीषा कोकणे आदी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.