
जळगाव शहरातील दि. 30/09/2022 रोजी रात्री 11.00 वाजता नंतर जाकीर बिस्मिल्ला बागवान वय 49, रा. बिलाल चौक, मदरसा गली, तांबापुरा जळगाव यांच्या मालकिची 40,000/- रुपये किमतीची काळ्या निळ्या रंगाची ऑटो रिक्षा बजाज कंपनीची प्रवासी रिक्षा क्रं. MIL-19-जे 7224 असे असलेली रीक्षा ही शामा फायर चौक, किस्मत टी सेटर जवळ तांबापुरा जळगाव येथे रिक्षा ड्रायव्हर तनझम बैग याने लावली होती. सदरची रीक्षा ही रात्रीचे वेळेस कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली होती म्हणुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची रिक्षा ही रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल रमेश चौधरी वय 40 वर्ष रा सिध्दीविनायक शाळेजवळ अयोध्या नगर जळगाव याने त्याचे साथीदारासह चोरी केल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे सो यांना मिळाली होती. त्यानुसार त्यास अयोध्या नगर जळगाव येथुन सफ अतुल वंजारी, चेतन सोनवणे, किशोर पाटील, मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे व होमगार्ड विजय कोळी, होम/संजय सोनवणे अशांनी त्यास काल दि 01/10/2022 रोजी ताब्यात घेतले होते. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले होते त्यास गुन्हयाकामी अटक केली होती यादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे सोबत असलेले साथीदार मोहसिन शहा सिंकदर शहा व रीजवान शेख उर्फ काल्या शेख गयासोद्दीन यांनी यांच्यासोबत केल्याचे माहिती समजल्यांने मोहसीन सिकंदर शहा रा तांबापुर जळगाव यास आज रोजी फुकटपुरा, तांबापुरा येथून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडुन सदर गुन्हयातील रिक्षा ही हस्तगत करण्यात आली असुन तिसरा आरोपी रिजवना उर्फ काल्या शेख याचा शोध सुरु आहे अनिल चौधरी यापुर्वी 04 चोरीचे गुन्हे दाखल असुन रिजवान उर्फ काल्यावर 20 गुन्हे दाखल आहे. तसेच मोहसीने शहा यांच्यावर 02 गुन्हे दाखल आहे ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्यांना आज रोजी मा. न्यायमुर्ती – •यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिवसांची पोलीस कस्टडी रीमांड दिली असुन सरकार तर्फे सरकारी वकिल -यांनी काम पाहीले.