मातृभूमीसाठी महात्मा व शास्त्रींनी कार्य केले महान, त्यांच्या या योगदानाचा भारतवासियांना असे अभिमान..
सचिन वखारे

अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसुल येथे दि.२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेची प्रिन्सिपल अल्ताफ खान यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्हार व शिक्षण व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.दि.१ ऑक्टोबर रोजी शिक्षक अझहर खतीब यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची *”तंबाखू मुक्त शाळा”* शपथची सामूहिक पठण घेतली. शाळेत विद्यार्थी व शिक्षकांनी शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ केला. प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमास अमोल आहेर, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, अमजद अन्सारी, गणेश सोनवणे, गौरव सैंदाणे, मनीष सैंदाणे, जयप्रकाश बागुल, माधुरी माळी, शर्मिला पवार, सुश्मिता देशमुख, चेतना माकूने, सुनीता वडे, आलिया खान, प्रणव पुंड, नरेंद्र देशमुख, कुणाल जेजुरकर सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.