प्रथम सत्र परीक्षा पूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार 65 हजार 38 पुस्तके मिळणार शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
संपादक राहुल वैराळ

शाळा सुरु होऊन तब्बल अडीच महिने उलटले तरी अनेक विद्यार्थी पाठय पुस्तकांपासून वंचित असल्याची बाब शिवसेना निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्यावर,त्यांनी तात्काळ सर्व अधिकारी वर्गाशी संपर्क साधून लवकरात लवकर पाठय पुस्तकं उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.याची दखल घेत दिनांक 26 ऑगस्ट रोजी सर्वच वर्तमान पत्रांमध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.सप्टेंबर महिन्यात या बातम्यांची दखल उप मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन नाशिक जिल्हा शिक्षणाधिकारी यांना याबाबत विचारणा केली होती.जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी 15 जुलै रोजी पुणे येथील बालभारती कार्यालयास अप्राप्त पुस्तकं मागणी पाठविली असून,अद्याप पुस्तकं प्राप्त झाले नाहीत असा खुलासा करण्यात आला होता.उप मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी वर्गाने पुणे येथे संपर्क करून नाशिक जिल्ह्याकरिता ताबडतोब पुस्तकं पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या.
29 सप्टेंबर रोजी पुणे येथून नाशिक येथे जिल्हास्तरावर 15 तालुक्यांसाठी एकूण 65 हजार 38 पुस्तकं प्राप्त झाली असून.दिनांक एक ऑक्टोबर रोजी तालुका स्तरावर पोहचविण्यात आली असून ,सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी शाळा स्तरावर पुस्तकं पोहच होतील व पुस्तकांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात भेटतील.अशी माहिती जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षा अभियान प्रमुख सुनील दराडे यांनी शिवसेना तालुका प्रकाश पाटील मा.प.स सदस्य उत्तमराव वाघ, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष सुरज नाईक यांना दिली.
पुढील आठवड्यात प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहे.त्यापुर्वी विद्यार्थ्यांना पुस्तक भेटली याबद्दल अनेक पालकांनी शिवसेना पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले आहे.तर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज,निफाड तालुका गट शिक्षणाधिकारी
केशव तुंगार,शिक्षण विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.