
निफाड तालुक्यातील लासलगाव सह परिसरात अवकाळी पावसाने गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना देण्यात आले गेल्या एक महिन्यापासून निफाड तालुक्यात लासलगाव सह परिसरात वादळी वारा व अवकाळी पावसाने मका सोयाबीन कांद्याची रोपे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे तसेच कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी या मागणीचे निवेदन निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुरासे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना दिले यावेळी खडक माळेगाव चे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे संजय शिंदे नितीन शिंदे लासलगाव खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल शिंदे देवगाव चे उपसरपंच लहानु मेमाने राजेंद्र शिंदे मनोज रायते पंकज शिंदे पुंडलिक शिंदे अमोल शिंदे बाळासाहेब शिंदे विजाराम शिंदे विक्रम शिंदे दत्ता मापारी टाकळी ग्रामपंचायत सदस्य हरीश गवळी उमेश जाधव संतोष बोराडे यांच्या शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी नामदार भुसे साहेब यांनी निफाड चे तहसीलदार शरद घोरपडे तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या तातडीने सूचना दिल्या