ताज्या घडामोडी
निफाड तालुक्यातल्या ४७ गावांसाठी नळपाणी पुरवठा योजनेचं भूमिपुजन आज नांदुर्डी येथे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झालं.
निफाड प्रतिनिधी.सचिन जाधव

जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचं पाणी, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी निफाड तालुक्यातल्या ४७ गावांसाठी ४५ कोटींहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या योजना थेट गावपातळीवर राबवण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिकार दिले आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींना थेट सरकारकडे पाठवावेत.
शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावपातळीवरच मिळाला पाहिजे, यासाठी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावं, असं आवाहन भारती पवार यांनी केलं.