जळगाव बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशनच्या जळगाव शहरात दुसरा वर्धापन दिवस प्रचंड उत्साहात व जल्लोषाने साजरा
प्रतिनिधी शाहिद खान

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी जळगाव बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेल्फेअर असोसिएशन चे वर्धापन दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जळगाव शहरातील सर्व पेंटर बांधव यांनी सहभाग घेतला वर्धापन दिवसांमध्ये बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनच्या दोन वर्षाची कालावधीत सोबत जिल्हाध्यक्ष इस्माईल खान व त्यांच्या सहयोगी सदस्य संस्थेचे पदाधिकारी यांनी दोन वर्षात काय कार्य केले त्याची सविस्तर माहिती दिली पेंटर बांधवांना त्यांचे प्रशासनिक समस्या असो की आर्थिक त्यांना संघटनेचे माध्यमातून सहकार्य केले व पेंटर बांधवांचे प्रश्न व त्यांची समस्या सोडवल्या आणि सर्वांना संघटित करून एक शक्ती निर्माण केली या शक्ती तुन जळगाव शहरातील पेंटर बांधवांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले आणि आजही पेंटर बांधवांचे समस्या व त्यांचे कॉन्ट्रॅक्ट दाराकडून पैसे बुडवले जात होते त्यांना लढा देऊन पेंटर बांधवांचे या जळगाव शहरामध्ये सर्वांना संघटित करून संघटनेचे नाव पुढे केले व महाराष्ट्र राज्य बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये पेंटर बांधवांची सदस्यता नोंदणी करून दिल्याच्या असे सर्व काम केले या वर्धापन दिवसाच्या शुभ अवसरावर नवीन पेंटर बांधवांनी या दिवसानिमित्त आपली नवीन सदस्यता नोंदवली संघटनेचे अध्यक्ष इस्माईल खान भाई यांच्या हस्ते नवीन सदस्य *कलीम बेग* *मोहम्मद शेख मुसा*,*शेख युनूस* *रियाज पेंटर* यांच्या सत्कार करून त्यांचा संघटनेमध्ये स्वागत केले त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
*वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे*
1) *दगडू दादा*( जिल्हा मार्गदर्शक, जळगाव बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन)
2) *सचिन भाऊ पाटील*(जळगाव शहर अध्यक्ष, जळगाव बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन)
3) *अखिल खान*( जिल्हा ज्येष्ठ सदस्य, जळगाव बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन
4) *इरफान शेख*( प्रमुख मार्गदर्शक व वक्ते तथा सामाजिक कार्यकर्ता)
5) *अहेमद खान*( जिल्हा संपर्कप्रमुख जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशन
या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाची अध्यक्षता *इस्माईल भाई खान* यांनी केक कापून व फटाके फोडून वर्धापन दिवसाच्या जल्लोष साजरा केला सोबत गफुर मामू सुभान पेंटर,समीर पेंटर,गणेश प्रजापती पेंटर,फुलमारी भाऊ पेंटर,कदीर मलिक पेंटर,राजू भाऊ पेंटर, दिलीप भाऊ पेंटर,प्रकाश सोनवणे हे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.