भावसारांची देवी समजल्या जाणाऱ्या निमगाव वाकडा येथील हिंगलाज माता व रेणुका माता देवीच्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
संपादक राहुल वैराळ

लासलगाव पासून २/३ किलोमीटर च्या अंतरावर रेणुका माता मंदिर आहे. ही देवी भावसारांची देवी म्हणून पण ओळखली जाते
चला तर मग जाणून घेऊ निमगाव वाकडा येथील रेणुकामाता मंदिराचा इतिहास
स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून भाविकांची निष्ठा असलेले हे मंदीर !
रंगोजिशेठ गोविंदशेठ भावसार यांच्या वंशजांकडून न्यायभूमी चे प्रतिनिधी यांनी जाणून घेतलेला इतिहास
ह्या देवालयाचा सत्यघटनेवर आधारित इतिहास आहे. सुमारे इ.स. १९०० ते १९१० च्या काळात स्व. रंगोजीशेठ गोविंदशेठ भावसार हे
व्यवसायासाठीच्या प्रवासात येथे झाडाखाली विश्रांती घेत असत. त्यांना स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला कीं “तू ज्या झाडाखाली विश्राम करतोस त्याखालीच आम्ही आहोत. आम्हास प्रकट कर”. त्यानुसार शोध घोतला असता तेथे देवींचे दोन मुखवटे दृष्टिस पडले.त्याच ह्या श्री हिंगलाज व श्री रेणुका माता होय. सर्वांच्या व कुटुंबाच्या सहकार्याने त्यांनी मुर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन हे मंदीर साकारले. तोच हा सध्याचा गाभारा होय ! कालमानानुसार पुढे त्यांच्या वंशजांनी, गावक-यांनी व भक्तांनी देवालयाचा विस्तार करुन सुशोभिकरण केले व अनेक सुखसोयी उपलब्ध केल्या. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे असे हे पारंपरिक श्रध्दास्थान होय.
भावसार क्षत्रिय समाज लासलगाव यांच्या असे निदर्शनास आले की देवी च्या पादुका ह्या काही प्रमाणात खंडित झाल्याचे जाणवले त्वरित लासलगाव क्षत्रिय भावसार समाजाने ह्या पादुका विसर्जित करून नवीन पादुका तयार करून त्यांचे विधिवत पूजा आर्च्या करून त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय लासलगाव क्षत्रिय भावसार समाजाने घेतला व सर्व समाज कार्यकारिणी व संपूर्ण भावसार क्षत्रिय समाज एकत्र येऊन नवरात्रीची पहिली माल २६ सप्टेंबर वार सोमवार पहाटे ५ वाजता मोठ्या उत्साहाने सर्व भावसार समाज एकत्र येऊन ह्या पादुकांची वाजत गाजत फटाक्यांचा जल्लोष करत पालखी मिळवण्यात आली सोबत भजनी मंडळाचा गजर चालू होता सर्व वातावरण मंगलमय झाले होते विधिवत पूजा होम हवन झाल्यानंतर पादुकांची प्राणप्रतिष्ठा झाली
सम्पूर्ण मंदिर परिसर हा रांगोळी व फुलाच्या गालीच्यानी फुलून गेला होता ह्यावेळी समाजातील सदस्यांनी भाविकांना फराळ व चहा वाटप करण्यात आला एकूणच लासलगाव क्षत्रिय भावसार समाजाने जल्लोष्यात देवी रेणुका माता व देवी हिंगलाज माता यांच्या पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला
ह्यावेळी भावसार क्षत्रिय समाज लासलगाव/लासलगाव भावसार समाज महिला मंडळ,लासलगाव मधील भावसार समाजातील अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सहकुटुंब कार्यक्रमासाठी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा उत्सव समितीचे यावेळी मोलाचे सहकार्य मिळाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील सर्वांचे योगदान लाख मोलाचे ठरले नासिक भावसार क्षत्रिय समाज ,आसपास च्या पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते.