
हातकणंगले ते वडगाव जाणाऱ्या रोडची दूरदक्षा झाली आहे रोडची अवस्था रस्त्यात खडे का खड्ड्यात रस्ता हे समजेनासे झाले आहे नागरिकाच्या मध्ये असा प्रश्न पडला आहे की रस्त्यावरून कशा पद्धतीने गाडी चालवावी हे कळेनासे झाले आहे लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांच्या मधून उमटत आहे अशा या खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये एक्सीडेंट होण्याची शक्यता दिसत आहे सातत्याने या रस्त्यावर एक्सीडेंट होण्याची प्रमाण ही वाढले आहे तसेच सावर्डे गावामध्ये लगत या रस्त्याची अवस्था भयंकर वाईट झालेली आहे एखादा नागरिक त्या खड्ड्यामध्ये पडून मरण पावल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का असा सवाल सावर्डे व परिसरातील गावातील नागरिकांच्या मध्ये उमटत आहे काही दिवसापूर्वी एक लेडीज सावर्डे या ठिकाणी रस्त्याजवळ थांबून जोर जोरात रडू लागली होती तिची विचारपूस केले असता ती आणि तिचे मिस्टर हातकणंगले वरून वडगाव कडे जात होते त्यावेळी दोन तोळ्याचे मंगळसूत्र गाडीवरून येत असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे बसत असलेल्या हदऱ्याने पडले होते या पद्धतीने दागिनेच काय अनेक लोकांचा जीव गमावण्याची वेळ या रस्त्यामुळे येणार असे दिसून येते त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करून घ्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या कडून होत आहे