ताज्या घडामोडी

शेळी मेंढी पालन हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी मेंढपाळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज मा. श्री.संजय वाघमोडे

हातकणंगले तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

अंबप / धनगर समाजाची प्रगती करायची असेल तर धनगर समाजाचा असणारा मुख्य परंपरागत शेळी मेंढी पालन हा व्यवसाय बळकट करण्यासाठी समाजबांधवांनी मेंढपाळांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र आत्मसात करून मेंढपाळांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे जास्तीत जास्त मुलं शिकली तरच मेंढपाळांच्या जीवनात प्रकाश पडेल आणि ऊन वारा पाऊसात सुरू असलेले भटकंती थांबेल. मेंढीपालन हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने कसा करता येईल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय वाघमोडे साहेब यांनी अंबप तालुका हातकणंगले येथील संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर,जिल्हा संघटक अनिल बनकर, करवीर तालुका अध्यक्ष बाळासो कोळेकर, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे,वाळवा तालुका अध्यक्ष महादेव गावडे उर्फ़ महाराज, हे प्रमुख उपस्थित होते ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी पडीक जमिनी लागवडी खाली आणल्या वन विभागाने कुऱ्हाड बंदी चराई बंदी केली गायरान जमिनी गावातील धंदा धनदांडग्यांनी अतिक्रमण करून संपुष्टात आणल्या. शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी क्षेत्र झपाट्याने कमी झाले. शेतकरी मेंढपाळ यांच्यात संघर्ष सुरू झाला. रोज कुठे ना कुठे मेंढपाळांना मारहाण होत आहे. अनेक मेंढपाळ मारहाणीत गंभीरित्या जखमी झाले काहींना तरी कायमचे अपंगत्व आलेले आहे.याला वैतागून मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या विकून रोजंदारीवर कामाला जाणे पसंत करत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मेंढी पालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने कसा करता येईल.याचा विचार करायला हवा. यशवंत क्रांती संघटना ही तळागाळातील लोकांच्यासाठी काम करत असून मेंढपाळ व डंगे धनगर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे.कवठेमंकाळ तालुक्यातील वाघोली येथे वीज पडून ठार झालेल्या कै. रामचंद्र गडदे या मेंढपाळांच्या वारसांना संघटनेच्या माध्यमातून चार लाख तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली. समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त व्यवसाय करावेत यासाठी वसंतराव नाईक इतर मागासवर्गीय महामंडळ यांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज मिळवण्यास तरुणांना अडचणी येत होत्या याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून महामंडळाच्या सर्व योजना जिल्हा मध्यवर्ती बँकातून सुरू केल्या आहेत याचा लाभ तरुणाने घ्यावा. यशवंत क्रांती संघटना आपली आहे तिच्या प्रत्येक गावात शाखा काढून तिला आपण सर्वजण मिळून बळकट करूया असे आव्हान बाळासाहेब कोळेकर यांनी केले. शाखा संपर्क प्रमुख श्री. राजु काळे यांनी प्रास्ताविक करताना संजय वाघमोडे साहेब यांनी अंबप गावातील मेंढपाळांनी सोलापूर सांगली येथे कशा पद्धतीने मदत केली यांची माहिती दिली.उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी करजवडे आष्टा ऐतवडे बुद्रुक शाखा पदाधिकारी, अंबप शाखा अध्यक्ष शिवाजी हिरवे, उपाध्यक्ष महादेव हिरवे सेक्रेटरी पोपट हिरवे खजिनदार अनिल हजारे संघटक सुरेश हिरवे, महिपती वाघमोडे,तसेच तरूण व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!