राजर्षी शाहू शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा उत्सवात संपन्न
प्रतिनिधी राहुल घोलप

राजर्षी शाहू शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था शाहूवाडी, ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर
यांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शांततेत, उत्साहवर्धक व आनंदमय वातावरणात झाली
सभेची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. दिपप्रज्वलन संस्थेचे संस्थापक चेअरमन मा बी.डी.पाटील सरांचे हस्ते झाले.तर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार मा. पी.एम.मोहिते सरांनी घातला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा.बी.डी.पाटील सर होते. सभेचे प्रास्ताविक मा. पी.एम.मोहिते सर यांनी केले. तर सभेचे सुत्रसंचालन संस्थेचे व्हा.चेअरमन मा.एस. ए.लोहार सर यांनी केले.
सभेत बोलताना संस्थापक मा.बी.डी पाटील सरांनी संस्थेची झालेली प्रगतीचा आलेखाबाबत समाधान व्यक्त केले
तसेच शिक्षक बॅन्केचे माजी चेअरमन मा.साहेबराव शेख सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना संस्थेची ठेवी ही तीन कोटीची आहे तर अडीच कोटीची कर्ज वाटप केले आहे असे सांगितले.
सभेचे शेवटी सभासंदाना डिव्हीडंडचे वाटप करणेत आले संस्थेच्या वाटचालीबाबत सभासद समाधानी होते. आभार मा.तानाजी वाघमोडे सरांनी मानले. सभा खेळीमेळीत पार पडली.