मा.राष्ट्रपती व मा. पंतप्रधान याना प्रधानमंत्री योजनेचे मोफतचे धान्य एक वर्ष पूर्ववत सुरू ठेवणेसाठी दिल्ली येथे निवेदन.
तालुका प्रतिनिधी राहुल घोलप

कोरोना महामारीच्या काळामध्ये केंद्र शासनाने पंतप्रधान योजनेचे मोफत धान्य सुरू केले होते.
हे धान्य सप्टेंबर महिनाअखेर बंद होणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती. कोरोना काळापासून आत्तापर्यंत जनतेची आर्थिक परिस्थिती तसेच कौटुंबिक परिस्थिती अजून स्थिरस्थावर झालेली नाही या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करून केंद्र शासनाने लोकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून हा निर्णय रद्द करून आणखी एक वर्ष हे मोफतचे धान्य पूर्ववत चालू ठेवावे.तसेच Give it up ही योजना बंद करून समाजातील सर्वच घटकांना समान लेखून खरोखर जे शासकीय निमशासकीय घटक, राजकीय घटक आहेत यांना पंतप्रधान मोफत धान्य योजनेपासून व रास्तभाव धान्यापासून वंचित ठेवावे.
या पंतप्रधान मोफत धान्य योजनेच्या धान्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत आहे.अत्याधुनिक औद्योगिक यंत्रणेमुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या हाताला काम नाही .कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .त्यामध्ये जर ही योजना बंद झाली तर त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होईल .या सर्वांचा अगत्याने जाणीवपूर्वक विचार करून आणखी एक वर्षभर पंतप्रधान योजनेचे मोफत धान्य पूर्ववत सुरू ठेवावे यासाठी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन हे निवेदन देण्यात आले यावेळी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी सतीश विठ्ठल मोटे,
माहिती अधिकार व मानवाधिकार विभाग कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे,तालुका कार्याध्यक्ष रोहित कांबळे,श्रीकांत शिंग़ाई,पत्रकार विजय धंगेकर व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पुकाळे उपस्थित होते