कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप!! नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसानिमित्त बाबा डमाळे यांचा उपक्रम!!

सशक्तभारत,सदृढ बालक
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघा मध्ये बाबासाहेब डमाळे मित्र मंडळा तर्फे कुपोषित बालकांना सुदृढ पोषण आहार वाटप गावा – गावात जाऊन करण्यात येत आहे. याचे वाटप वृषाल बाबासाहेब डमाळे व अनुलोम संस्थेचे जयप्रकाश वाघ यांच्या हस्ते करण्यात येत आहे.ममदापुर येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला.याप्रसंगी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास गुडघे पाटील, निवृत्ती बेंडके,बापू म्हस्के,हौशाबाई बेंडके,योगिता गुडघे, सुनिता शिंदे,कुपोषित बालक,अंगणवाडी सेविका, पालक ,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते..हा उपक्रम योग्य लाभार्थ्यांसाठी राबविल्याबद्दल व यापूर्वी मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरही योग्य पद्धतीने राबवल्याबद्दल लोकांमधून बाबासाहेब डमाळे पाटील यांचे कौतुक होत आहे. तर थोडीफार सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळा तर्फे सर्वांना धन्यवाद दिले जात आहेत.