
नाशिक जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कै.सौ.कासुबाई दावल ठोके फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच ” “बांध वाचवा, बांध वाढवा, पर्यावरण जगवा” या मोहीमेचे प्रणेते संजय ठोके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केले आहे. या वर्षी मोठ्याप्रमाणात मुसळधार व ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने तसेच संततधार व ढगाळ हवामान असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीवाला सह इतर पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.महागडी खते, बी- बियाणे, मजूरी,इंधन, वीजबिल,इतर खर्च, करताना शेतकरीवर्गाची दमछाक होत आहे. त्यात कांदयासह इतर पिकांना भाव नसल्याने मातीमोल किमतीत शेतकऱ्यांचा माल विकावा लागत आहे.त्यामुळे शेतीकरणे दिवसेदिवसे अवघड होत आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना सरसकट पुर्ण विमा भरपाई देण्यात येवून कांदा पिकाला हमी दयावा अशी मागणी केली आहे.