5 ऑक्टोंबर ला पेठ वडगाव ते माणगाव परिवर्तन महा रॅलीचे आयोजन,,,,,,,,,
प्रतिनिधि संतोष कोठावले

हातकनंग ले-तालुका परिसरातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचा उपक्रम,,,,,,,,,,,, धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हातकणंगले तालुका व परिसरातील समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून परिवर्तन महा रॅलीचे आयोजन बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे पेठ वडगाव ते माणगाव या मार्गावर ही रॅली निघणार आहे हातकणंगले तालुका व परिसरातील समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याकडून गेली पाच वर्षे हा उपक्रम सुरू असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे 14 ऑक्टोंबर 1956 स***दसऱ्याच्या मुहूर्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयाया यांना घेऊन बुद्ध धम्माची दीक्षा दिली या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी पेठवडगाव येथून मोटरसायकल फक्त टू व्हीलर रॅलीने ऐतिहासिक मानगाव येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात येते तसेच तथागतांना महावंदना करण्यात येते. दीपस्तंभ बुद्ध विहार पेठ वडगाव येथे सकाळी नऊ वाजता एकत्रित जमून राहिलेला सुरुवात करण्यात येणार आहे शिरोली फुलाची सांगली फाटा मार्ग राष्ट्रीय महामार्गावरून माणगावच्या दिशेने रॅली जाणार आहे राहिले शुभ्र वस्त्रे परिधान पंचशील ध्वज घेऊन रॅलीमध्ये महिला सह सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे